मनसेचे उरण विधानसभेचे उमेदवार सत्यवान भगत यांच्या प्रचार दौऱ्यासाठी जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद
आवाज कोकणचा / उरण
वार्ताहर - पुजा चव्हाण
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने १९० उरण विधानसभा मतदारसंघात अँड सत्यवान भगत यांना उमेदवारी दिली आहे.त्यांचा गावनिहाय प्रचार दौरा हा मनसेचे जिल्हाध्यक्ष संदेश भाई ठाकूर यांच्या उपस्थितीत सुरू झाला असून लाखो दास भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या दास्तान फाटा येथील श्री शिव समर्थांच्या स्मारकाचे दर्शन घेऊन बेलपाडा, गव्हाण,कोपर,न्हावा, उलवे शहरात घरोघरी प्रचारास सुरुवात केली.या प्रचार दौऱ्यासाठी जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
यावेळी मनसेचे रायगड जिल्हा अध्यक्ष संदेश ठाकूर, महिला सेना राज्य उपाध्यक्ष ऋतुजा ताई ,तालुका सचिव मंगेश वाजेकर, पनवेल उपाध्यक्ष निर्दोष गोधळी, चिंतामणी मुंगाजी, नरेंद्र मोकल, राजेश कोळी , उलवे शहराध्यक्ष राहुल पाटील, यशोदाताई उलवा शहर महिला अध्यक्ष, तुषार म्हात्रे आकाश देशमुख, प्रीतम तांडेल,तालुका उपाध्यक्ष राकेश भोईर,दीपक पाटील,विभागीय अध्यक्ष बबन ठाकूर, अभय पाटील यांनी मनसेचे उमेदवार अँड सत्यवान भगत यांना विजयी करण्याचे आवाहन मतदार राजाला केले.
उरण तालुक्यातील गोर गरीब शेतकऱ्यांनी आपल्या शेतजमिनी कवडीमोल भावाने देशाच्या उन्नतीसाठी शासनाला व काही खाजगी भांडवलदारांना दिल्या.मात्र त्या शेतजमिनीवर उभे राहणारे विकासक त्या शेतकऱ्यांना त्याचा हक्क न देता.त्याना देशोधडीला लावण्याचे काम करत आहेत.यासंदर्भात सदर शेतकऱ्यांना त्याचा हक्क मिळवून देण्यासाठी विकासकांना ( खाजगी भांडवलदारांना ) त्याचा जाब विचारण्यासाठी मी आवाज उठविला तर माझ्या सारख्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करुन माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असतील तर मी घाबरत नसून यापुढे ही जनतेच्या न्याय हक्कासाठी आवाज उठवणार असे उद्गार मनसेचे उमेदवार तथा तालुकाध्यक्ष अँड सत्यवान भगत यांनी आपल्या प्रचार दौऱ्या प्रसंगी व्यक्त केले.
Comments
Post a Comment