श्री एकविरा देवी मंदिराचा भूमिपूजन सोहळा थाटामाटात संपन्न
➖➖➿🎶➿🎶➿➖➖
एकविरा भक्त जयेंद्रदादा खुणे यांच्यासह युवा नेतृत्व राजोल संजय पाटील, सुप्रसिद्ध गायक, सिने अभिनेते इ. मान्यवरांची उपस्थिती
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
आवाज कोकणचा
मुंबई दि. ७ प्रतिनिधि,
चुनाभट्टी, मुंबई येथील आगरी समाज विकास संघाच्या वतीने चूनाभट्टी येथे श्रद्धास्थान आई श्री एकविरा देवी मंदिराचे भव्य मंदिर व्हावे म्हणून अनेक वर्षांपासून पाठपुरावा केला होता . गुरुवार दिनांक ७ नोव्हेंबर २०२४ रोजी आगरी कोळी भवन, व्हि.एन. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई - २२ येथे मोठ्या थाटामाटात व भाविकांच्या उत्साहात श्री एकविरा देवी मंदिराचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.
आई एकाविरा देवीच्या भूमिपूजन सोहळ्याचा मान चुनाभट्टी येथील आगरी समाजातील पाच जोडप्यांच्या हस्ते धार्मिक पद्धतीने होम हवन करून करण्यात आले.
कार्यक्रमाप्रसंगी सुप्रसिद्ध आगरी कोळी गायक किसन फुलोरे , हर्षला पाटील , केतन पाटील यांच्या एकविरा आईच्या गायणाने सर्व भक्त भाविक मंत्रमुग्ध झाले होते .
संस्थेचे संस्थापक व माजी अध्यक्ष श्री. धिरज कालेकर यांनी आगरी समाज विकास संघाच्या पुढाकाराने आई श्री एकविरा देवी मंदिराच्या निर्मितीकरिता भव्य नवीन मंदिर भूमिपूजनाचा सोहळा आयोजित केला होता.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आगरी सेना मुबंई प्रदेश अध्यक्ष व एकविरा भक्त श्री. जयेंद्रदादा खुणे यांच्यासह आराध्य लोकसेवा प्रतिष्ठान अध्यक्ष श्री. विजय तांडेल , युवा सेना महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य समाजसेविका कु.राजोल संजय पाटील,
सिने अभिनेते श्री. मयुरेश कोटकर, एकविरा पदयात्री मंडळाचे अध्यक्ष श्री. जितेंद्र म्हात्रे, नवी मुंबई मानाची पालखी अध्यक्ष श्री. शैलेश भोईर, सुप्रसिध्द चित्रकार मोरेश्वर पाटील, उद्योजक संतोय म्हात्रे, पत्रकार सतीश पाटील, माहुल कोळी आगरी भूमिपुत्र संस्था अध्यक्ष हेमंत वैती,
सामाजिक कार्यकर्ते अभय थळी , आगरी सेना दक्षिण मध्य मुंबई अध्यक्ष अक्षता म्हात्रे, सिद्धी खुणे, मनसूख म्हात्रे, दिपक पाटील इतर अनेक कलावंत, समाज प्रतिनिधी व मान्यवर मोठ्या सख्येने उपस्थित होते.
आगरी कोळी समाज, एकविरा भक्तांचा आणि आपल्या समाजातील लोकप्रतिनिधी यांचे कार्ला लोणावळा आणि एकविरा मंदिराचे नाते हे पुरातन काळापासून असून मुंबईत आई एकविरा देवीचे मंदिर व्हावे अशी माझी इच्छा होती. त्याचे आज मुंबईत स्वप्न पूर्ण होत असून प्रत्येक समाज बांधवांनी, नेत्यांनी, उद्योजकांनी आणि समाजातील दानशूर व्यक्तींनी आपापल्या गावात, तालुक्यात आई एकविरा देवीचे मंदिर उभारल्यास त्या मंदिरावर आपल्याच समाजातील ट्रस्टी असतील. आपलेच पुजारी असतील, आपलीच दुकाने असतील. आणि दानपेटितुन मिळणाऱ्या उत्पन्नातून आपण आपल्या समाजातील मुलांचा आणि गावाचा विकास करता येईल.
हेच आई एकविरा देवीची सेवा करण्याचे भाग्य आणि संधी प्रत्येक समाज बांधवांना आणि भक्तांना मिळेल . असे जयेंद्रदादा खुणे यांनी समाज बांधव व एकविरा भक्तांना संबोधित केले.
मुंबईचे युवा नेतृत्व राजोल संजय पाटील यांनीही शुभेच्छा दिल्या. सर्व प्रमुख अतिथींचे स्वागत व सत्कार संस्थापक श्री. धिरज कालेकर यांनी केला. अध्यक्ष श्री. प्रदीप पाटील, सेक्रेटरी श्री. संदिप पिंगळे, खजिनदार श्री. अनिल तांडेल, उपाध्यक्ष श्री. प्रतीक गायकर, उपसेक्रेटरी श्री. धनाजी खरसांबळे, उपखजिनदार श्री. मयूर म्हात्रे, कार्याध्यक्ष श्री. राजेश कांबळी यांनी आणि सर्व ग्रामस्थ, महिला, पुरुष पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता खूप मेहनत घेतली.
Comments
Post a Comment