आवाज कोकणचा / मुंबई
प्रतिनिधि
चुनाभट्टी येथे श्री एकविरा देवी मंदिराच्या भव्य भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन...
--------------------------------------
जयेंद्रदादा खुणे, राजोल संजय पाटील, विजय तांडेल, मयुरेश कोटक, किसन फुलोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार
मुंबई : चुनाभट्टी, मुंबई येथील आगरी समाज विकास संघ ( रजि. ) यांच्या माध्यमातून आई श्री एकविरा देवी मंदिराचा भव्य भूमिपूजन सोहळा गुरुवार दिनांक ७ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ठीक ११ वाजता स्थळ : आगरी कोळी भवन, व्हि.एन. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई - २२ येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
संस्थेचे संस्थापक व माजी अध्यक्ष श्री. धिरज कालेकर यांच्या पुढाकाराने श्री एकविरा देवीच्या भव्य अशा नवीन मंदिराचा भूमिपूजन सोहळा संपन्न होत आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आगरी सेना मुबंई प्रदेश अध्यक्ष व एकविरा भक्त श्री. जयेंद्रदादा खुणे , आराध्य लोकसेवा प्रतिष्ठान अध्यक्ष मा.श्री. विजय तांडेल, युवा सेना महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य समाजसेविका कु.राजोल संजय पाटील, सिनेमा अभिनेते श्री. मयुरेश कोटकर, एकविरा पदयात्री मंडळाचे अध्यक्ष श्री. जितेंद्र म्हात्रे, नवी मुंबई मानाची पालखी अध्यक्ष श्री. शैलेश भोईर, सुप्रसिद्ध गायक श्री. किसन फुलोरे, सुप्रसिद्ध गायक श्री. केतन पाटील, मिमिक्री कलाकार श्री. रमेश भंडारी व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
संस्थापक व माजी अध्यक्ष श्री. धिरज कालेकर यांच्या पुढाकाराने २००२ मध्ये संस्थेची स्थापना करण्यात आली. संस्थेच्या माध्यमातूम MPSC / UPSC मार्गदर्शन शिबीर, भव्य स्वरूपात आगरी कोळी महोत्सव , आगरी कोळी भवन, नवी मुंबई विमानतळ कृती समितीतून दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ आंदोलन, असे अनेक समाजपयोगी उपक्रम राबविले आहेत.
आगरी कोळी बांधवांच्या मागणीनुसार चुनाभट्टी मध्ये आगरी कोळी समाजाची कुलस्वामिनी आई एकविरा देवीचे भव्य मंदिरा उभे रहावे म्हणून सर्व समाज बांधवांच्या सहकार्याने हा भूमिपूजन सोहळ्याला आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबईतून अनेक समाज बांधव व एकविरा भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे आगरी समाज विकास संघाचे अध्यक्ष श्री. प्रदीप पाटील यांनी सांगितले. सेक्रेटरी श्री. संदिप पिंगळे, खजिनदार श्री. अनिल तांडेल, उपाध्यक्ष श्री. प्रतीक गायकर, उपसेक्रेटरी श्री. धनाजी खरसांबळे, उपखजिनदार श्री. मयूर म्हात्रे, कार्याध्यक्ष श्री. राजेश कांबळी हे कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता खूप मेहनत घेत आहेत.
आई श्री एकविरा देवी मंदिराच्या या भव्य भूमिपूजन सोहळ्याला सर्व आगरी कोळी समाज बांधवानी व एकविरा भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थापक श्री. धिरज कालेकर यांनी आवाहन केले आहे.
Comments
Post a Comment