जनतेच्या न्याय हक्कासाठी आवाज उठविणे ही मी माझी चूक मानत नाही - सत्यवान भगत 



उरण दि ७ ( वार्ताहर - पुजा चव्हाण )

उरण- खोपटा येथील गोर गरीब शेतकऱ्यांनी आपल्या शेतजमिनी कवडीमोल भावाने देशाच्या उन्नतीसाठी शासनाला व काही खाजगी भांडवलदारांना दिल्या.मात्र त्या शेतजमिनीवर उभे राहणारे विकासक त्या शेतकऱ्यांना त्याचा हक्क न देता.त्याना देशोधडीला लावण्याचे काम करत आहेत.



यासंदर्भात सदर शेतकऱ्यांना त्याचा हक्क मिळवून देण्यासाठी विकासकांना ( खाजगी भांडवलदारांना ) त्याचा जाब विचारण्यासाठी मी आवाज उठविला तर माझ्या सारख्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करुन माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असतील तर मी घाबरत नसून यापुढे ही जनतेच्या न्याय हक्कासाठी आवाज उठवणार असे उद्गार मनसेचे तालुकाध्यक्ष अँड सत्यवान भगत यांनी व्यक्त केले. 

Comments

Popular posts from this blog