आवाज कोकणचा / नवी मुंबई
वार्ताहर / दिनांक : 24 डिसेंबर
श्री. संतोष संकपाळ यांची मर्दानी स्पोर्ट्स राष्ट्रीय पातळीवर पंच म्हणून निवड...
मर्दानी स्पोर्ट्स राष्ट्रीय " स्पर्धा जळगाव येथे संपन्न...
केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या हस्ते उद्घाटन....
"मर्दानी स्पोर्ट्स असोसिएशन जळगाव व मर्दानी स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र" यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "तिसऱ्या मर्दानी स्पोर्ट्स राष्ट्रीय चॅम्पियनशिप" स्पर्धेचे जळगाव येथे जिल्हा क्रीडा संकुल मध्ये २०-२२ डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी माननीय रक्षाताई खडसे क्रीडा राज्यमंत्री भारत सरकार यांनी स्पर्धेचा शुभारंभ करून, उपस्थित खेळाडू यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी मर्दानी स्पोर्ट्स फेडरेशन इंडिया चे अध्यक्ष श्री. दिलीप सिंग, सचिव श्री. संतोष खंदारे, मर्दानी स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे अध्यक्ष श्री. प्रशांत मोहिते, सचिव श्री. विनोद कुंजीर, स्पर्धेचे तांत्रिक संचालक श्री. तुषार पवार, श्री. केतन आंधळे तसेच भारतातील १६ राज्याचे राज्य प्रतिनिधी उपस्थित होते.
स्पर्धेसाठी १६ राज्यांमधून एकूण ३७५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता आणि आपल्या चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करुन स्पर्धेची शोभा वाढवली.
राष्ट्रीय स्पर्धेत मर्दानी स्पोर्ट्स असोसिएशन मुंबई मधील विद्यार्थिनीनी घवघवीत यश प्राप्त केले. त्यांनी केतन आंधळे , शिल्पा बाबर , ऋषीकेश देवकर यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या संघासाठी ४ सुवर्ण पदक आणि २ रौप्य पदक पटकावले.
१) काव्य तांबे - सुवर्ण पदक 🥇
२) रिया सिंग - सुवर्ण पदक 🥇
३) श्रेया नायर - २ सुवर्ण पदक 🥇🥇
४) वैष्णवी नाईक - रौप्य पदक 🥈
५) वैदेही घोलप - रौप्य पदक 🥈
तसेच मर्दानी स्पोर्ट्स मुंबई असोसिएशनचे श्री केतन आंधळे यांची मर्दानी स्पोर्ट्स फेडरेशन इंडियाच्या तांत्रिक संचालक पदावर निवड करण्यात आली.
वरील सर्व विद्यार्थांचे एप्रिल-मे मध्ये भुतान येथे होणाऱ्या मर्दानी साऊथ आशिया स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
प्रशिक्षक श्री. संतोष संकपाळ यांची राष्ट्रीय पातळीवर पंच म्हणून निवड झाली असून समाजातील विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
Comments
Post a Comment