खालापूर मध्ये संदीप व उमा मुंढे यांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवत राष्ट्रवादी अजित पवार गटात मोठ्या संख्येने पक्षप्रवेश 


आवाज कोकणचा  / खालापूर
दिनांक 22 डिसेंबर  ( वार्ताहर राजू नायक)

वासांबे मोहपाडा जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गटाचे धडाडीचे कार्यकर्ते संदीप मुंढे व उमा मुंढे यांची जिल्हा परिषद व वासांबे ग्रामपंचायतीवर एक हाती सत्ता आहे. 


त्यांची कार्यशैली व कार्यकर्त्यांपरी तत्परता यामुळे विभागातील महाविकास आघाडीचे घटक पक्ष शिवसेना उबाठा गटाचे केदार भोईर, बाबू वाघमारे, विल्यम मार्टिस्ट, रवींद्र पाटील, संदेश मांडे, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कविता मांडे, काँग्रेस आयचे रवींद्र जांभळे, प्रमोद राईलकर, शेकापचे कैलास तांडेल , जगदीश मांडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी संदीप मुंडे यांच्या कार्यावर विश्वास ठेवत रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी अजित पवार गटात पक्षप्रवेश केला. 


सूत्रसंचालक संतोष चौधरी यांच्या मधुर वाणीने कार्यक्रमाला शोभा आली. 



या पक्षप्रवेशामुळे संदीप मुंडे व उमा मुंडे यांच्या राजकीय जीवनशैलीला याचा भरपूर फायदा होणार असून लवकरच उमा मुंढे या राजकारणातील एखाद्या मोठ्या पदावर विराजमान झालेल्या दिसतील असे जनमानसात बोलले जात आहे.





Comments

Post a Comment

Popular posts from this blog