आवाज कोकणचा / नवी मुंबई 

प्रतिनिधी ( उलवे) दि. 29 डिसेंबर 

सकल मराठा समाजातर्फे उलवे येथे मस्साजोग प्रकरणातील संतोष देशमुख यांना श्रद्धांजली व जाहीर निषेध..

     


            

आज रविवार दिनांक २९/१२/२०२४ रोजी सकल मराठा समाज उलवे विभागाच्या वतीने मस्साजोग , जिल्हा- बीड, गावचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख( सरपंच ) यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी व त्यांच्यावर झालेला हल्ला व निर्घृण पद्धतीने केलेला खून याचा जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी सकल मराठा समाजाचे समन्वयक यांनी एकत्र येऊन निषेध व्यक्त केला व श्रद्धांजली अर्पण केली.

  


स्वर्गीय संतोष देशमुख (सरपंच) यांच्या खुनातील काही मोकाट आरोपी यांना लवकरात लवकर अटक करावी . निपक्षपाती चौकशी करून कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी. यासाठी सकल मराठा समाज बांधव यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. अतिशय निंदनीय असे प्रकार शिवछत्रपती ,शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पवित्र भूमीमध्ये घडत आहेत .



 या प्रकरणातील आरोपी हे प्रथमदर्शी सराईत गुन्हेगार असल्याचे निदर्शनास येत आहे. कठोरातील कठोर शिक्षा आरोपींना देण्यात यावी अशी इच्छा सकल मराठा समन्वयकांच्या वतीने करण्यात आली. सदर कथित, निर्दयी व निर्घृण खून होऊन जवळपास २० दिवस उलटले आहेत तरीही आरोपी मोकाट फिरत आहेत.पोलिस त्यांना जेरबंद करुन अटक करीत नाहीत. महाराष्ट्र राज्यातील पोलीस तपास यंत्रणा अत्यंत सक्षम आहे. परंतु त्यामध्ये नक्कीच राजकीय हस्तक्षेप असावा असे तर्क वितर्क जनतेमधून व प्रसार माध्यमाद्वारे व्यक्त केले जात आहेत.. दिवसाढवळ्या, राजरोसपणे ,अपहरण करून निर्दयी हत्या करणारे आरोपी यांना गृह विभागाने तात्काळ अटक करावी व निपक्षपाती चौकशी करून कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी . अन्यथा सकल मराठा समाजाच्या वतीने प्रखर असे तीव्र आंदोलन छेडले जाईल अशी ग्वाही देत धरणे आंदोलनाची सांगता करण्यात आली.

    या आंदोलनासाठी श्री जयवंत त्रिंबक देशमुख (गव्हाण गाव) भा. ज .पा. सरचिटणीस पनवेल तालुका, श्री संकल्प महादेव घरत (संस्थापक अध्यक्ष संकल्प सामाजिक संस्था), श्री भास्कर देशमुख उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटना, श्री अनिल जगन्नाथ जाधव ज्येष्ठ नागरिक व समाज सेवक, युवा कार्यकर्ते व मराठा समन्वयक श्री नरेंद्र अनंत देशमुख. (छावा संघटना रायगड जिल्हा उपाध्यक्ष व स्वराज्य पक्ष उलवे नोड अध्यक्ष, श्री आकाश श्रीकांत देशमुख महाराष्ट्र नवनिर्माण सेना गव्हाण विभाग अध्यक्ष , श्री हितेश हरिचन्द्र शिंगरे शिवराज सांस्कृतिक व सामाजिक संस्था व प्रहार जनशक्ती पक्ष उलवे नोड अध्यक्ष, श्री संचित जगन्नाथ देशमुख , श्री लहू बबन देशमुख, श्री तुषार लहू देशमुख , श्री जयवंत शंकर चव्हाण , श्री नागनाथ धर्मराज पवार, श्री जगन्नाथ चव्हाण , श्री बाबाजी कोकाटे , श्री पांडुरंग सूर्यवंशी , श्री संभाजी सोनवणे , श्री नागनाथ कोटकर , श्री समाधान शेळके , श्री ज्ञानेश्वर गायकवाड, श्री प्रदीप अंभोरे , श्री रणजीत शिंदे सदर धरणे आंदोलनासाठी उपस्थित होते. 





   

Comments

Popular posts from this blog