श्रीमती भागुबाई चांगु ठाकूर विद्यालयाचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

  श्रीमती भागुबाई चांगु ठाकूर विद्यालयाचा पारितोषिक वितरण सोहळा महिला उत्कर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्ष डॉ . स्मिता पाटील व ज .आ भगत संस्थेच्या बोर्ड मेंबर वर्षा ठाकुर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न..

 जे.बी.एस.पी.संस्थेच्या श्रीमती भागुबाई चांगु ठाकुर विदयालय द्रोणागिरी उरण येथे कला व विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते.



 या प्रदर्शनाचे उद्घाटन पत्रकार उत्कर्ष समिती अध्यक्ष डॉ . अशोक ल. म्हात्रे व  श्री. एस. डी. म्हात्रे  यांच्या हस्ते  झाले होते.



 हे प्रदर्शन पालकांसाठी खुले होते व त्यांनी आपल्या पाल्यांचे कलागुण जाणून घेतले.वर्षभर घेतले जाणारे शालेय उपक्रम व स्पर्धा तसेच वार्षिक खेळांच्या स्पर्धांचे आयोजन दरवर्षी विद्यालयात केले जाते त्यातील विजेत्या व गुणी विद्यार्थ्यांना सन्मानित केले जाते .

उरण जवळील द्रोणगिरी नोड येथील श्रीमती भागुबाई चांगु ठाकूर विद्यालयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या बोर्ड मेंबर वर्षा प्रशांत ठाकूर व महिला उत्कर्ष समितीच्या महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. स्मिता पाटील प्रामुख्याने उपस्थित होत्या .


 शाळेचे चेअरमन चंद्रकांत घरत,  शाळा समिती सदस्य सुरेश पाटील,  सुनील पाटील व पालक शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.  



शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा काठे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून कार्यक्रमाला सुरुवात केली होती.



यावेळी पाहुण्यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनुराधा काठे ,  शिक्षिका रंजना पाटील,   विज्ञान शिक्षिका, व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. 

Comments

Popular posts from this blog