आवाज कोकणचा / पेण 

चैतन्य उषा लक्ष्मण पाटील  पोलीस दलातर्फे जीवनदूत 2025 पुरस्काराने सन्मानित


प्रतिनिधि - अरुण चवरकर

पेण तालुक्यातील कासू विभागातील पाटणी गावचा चैतन्य या विभागातील समाजसेवेचा उगवता तारा पाण्याचा प्रश्न शेतकऱ्यांचा, रस्त्यावर खड्डे असो विजेचा,स्वछतेचा प्रश्न कोणताही असो कागद कार्यवाही कायदेशीर करणार, मोर्चा काढणार, उपोषण सुध्दा करणार पण प्रश्न सोडवून दाखवणारा सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळख आहे .


आज मोठा जनसमुदाय त्यांच्या पाठी आहे आणि या सर्व कार्याची दखल घेत रायगड पोलिस दलातर्फे समाजसेवेचा जीवनदूत पुरस्कार 2025 साठी चैतन्य यांना भरतशेठ गोगावले, कॅबिनेट मंत्री यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

त्यावेळी महेंद्र दळवी मा.आमदार ,किशन जावळे, जिल्हा अधिकारी रायगड, सोमनाथ घार्गे, पोलिस अधीक्षक यांच्या समोर सन्मानित करण्यात आले त्यामुळे चैतन्य वर जनतेतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



Comments

Popular posts from this blog