डामरे ग्रामपंचायतचा अनोखा उपक्रम महीला उत्कर्ष समितीचे मोलाचे योगदान

 आवाज कोकणचा / सिंधुदुर्ग

कणकवली  ( प्रतिनिधी )

 डामरे ग्रामपंचायतचा अनोखा उपक्रम महीला उत्कर्ष समितीचे मोलाचे योगदान


हळदी कुंकवाचे वान म्हणून महिला बचत गट निर्मित थ्री इन वन लिक्विडचे वाटप


कणकवली तालुक्यातील डामरे येथे दिनांक 23 जानेवारी 25 रोजी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून पत्रकार उत्कर्ष समिती अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समिती महाराष्ट्रच्या वतीने महिलांसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्ताने समिती अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांनी हृदयरोग संदर्भात सखोल मार्गदर्शन केले.


 तसेच महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी सहकार्य करण्याची हमी दिली. बचत गटातील महिलांसाठी महिला आर्थिक विकास महामंडळ सिंधुदुर्गच्या अधिकारी भक्ती उंदळकर व सीमा गावडे यांनी महिलांच्या आर्थिक विकास , उद्योग आणि त्यातून स्वयंरोजगार निर्मितीसाठी महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले. सिस्टर व्ही. बी. मराठे व सिस्टर तेजस्विनी पारकर यांनी क्षयरोग व कर्करोग या संदर्भात सखोल मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक वळवी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले . 


सरपंच किरण कानडे उपसरपंच सागर साटम ग्रामपंचायत अधिकारी संगीता पाटील सदस्य विनिता सावंत अश्विनी पारकर पूजा कानडे बचत गट सीआरपी मानसी जाधव आशा सेविका ममता गावकर, पोलीस पाटील विश्वास सावंत , अंगणवाडी सेविका दर्शना व ग्रामपंचायत कर्मचारी यावेळी उपस्थित होते. 

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा महिला अध्यक्षा दीपा ताटे यांची सिंधुदुर्ग जिल्हा महिला आयोगाच्या सदस्य पदी निवड झाल्याबद्दल समितीच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आले. 



या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन समितीच्या देवगड तालुका अध्यक्ष संगीता पाटील तसेच गावचे सरपंच किरण कानडे यांनी यशस्वीरित्या केल्याबद्दल त्यांना समितच्या वतीने सन्मानित करण्यात आले

या कार्यक्रमासाठी महिला उत्कर्ष समिती कोकण विभाग अध्यक्ष ज्योतिका हरयाण, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष दीपा ताटे, सचिव सुप्रिया पाटील, सदस्य स्वरदा खांडेकर , सदस्य दूर्वा मानकर , कुडाळ उपाध्यक्ष सुस्मिता राणे यांच्यासह विभागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


डामरे ग्रामपंचायत हद्दीतील बचत गटाच्या महिलांनी स्वयंरोजगाराच्या माध्यमातून तयार केलेले थ्री इन वन लिक्विड उपस्थित महिलांना हळदी कुंकवाचे वाण भेट म्हणून दिले. 






Comments

Popular posts from this blog