आवाज कोकणचा / पेण
पेण काराव ग्रामपंचायत अपहार तक्रारदार दीव्यांग लाभार्थी आक्रमक 26 जानेवारी रोजी करणार आमरण उपोषण
पेण - ( अरूण चवरकर )
पेण तालुक्यातील काराव ग्रामपंचायत हि विभागातील श्रीमंत ग्रामपंचायत म्हनूण ओळखली जात असून अनेक वेळा अपहरणाच्या तक्रारी होऊन याच ग्रामपंचायती मध्ये काराव ग्रामस्थांनी एका वर्षात पाच ग्रामसेवक काम सोडून बदली घेऊन निघून गेले .
एवढे सुज्ञ नागरिक असताना आत्ता दिव्यांग लाभार्थ्यांच्या निधी मधे मोठा अपहार केल्याचा तक्रार मंगेश म्हात्रे यांनी पेण पंचायत समिती, जिल्हा परिषद अलिबाग,कोकण आयुक्त मुंबई या सर्वांना निवेदन देऊन व पत्रकार परिषदेत घेऊन अपहार सन 2018 ते 2022 या काळात सरपंच अपर्णा तुलसीदास कोठेकर व ग्रामसेवक संजय जाधव यांच्या काळात झाल्याच सांगितले परंतु तक्रार करून दोन महिने झाले तरी शासन वेळ काढू पना करताना दिसत आहे .
मंगेश म्हात्रे यांनी उपोषणाचा इशारा दिल्या नंतर पेण चे बीडीओ उपोषण स्थगित करण्याची विनंती करत आहेत.
परंतू मंगेश काशिनाथ म्हात्रे यांनी 26/01/2025 रोजी जिल्हा परिषद अलिबाग येथे आमरण उपोषण जो पर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमरण उपोषण सोडणार नाही असा निर्धार केला असून अन्यायाला वाचा फोडल्याशीवाय माघार घेणार नाही असे मत पत्रकारांना सांगितले आता काय न्याय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
Comments
Post a Comment