आवाज कोकणचा/ नवी मुंबई 

उरण वाहतूक शाखेच्या वतीने विशेष मोहीम.... 


वार्ताहर : पूजा चव्हाण 

उरण वाहतूक शाखेच्या वतीने वाहतूकच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याने या वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या व बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्याचे उद्देशाने तसेच वाहनांचे अपघातांवर घालण्यासाठी मागील वर्षी 2024  माहे जानेवारी ते डिसेंबर आत्तापर्यंत मोटर वाहन कायद्याखाली एकूण-45468 वाहन चालकाविरुद्ध विविध कलमाखाली दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. 



वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित वाहन चालकांना एकूण 3,80,85,950/- इतक्या रकमेचा दंड आकारण्यात आला असून सदर दंडा पैकी एकूण रू. 27,11,600/-  इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली आहे.

     


 

    सदर कारवाई अंतर्गत रस्त्यावर चुकीच्या ठिकाणी वाहने पार करून रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर 20,813 कारवाई करण्यात आल्या , विदाऊट हेल्मेट दुचाकी वाहन चालवणाऱ्या चालकाविरुद्ध4741, वाहन चालविताना सीट बेल्ट न वापरलेल्या वाहन चालकाविरुद्ध 12319  कारवाई करण्यात आल्या तसेच ड्रिंक अँड ड्राईव्ह च्या वाहन चालकाविरुद्ध 132 दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. 

         नवीन वर्षाच्या  पार्श्वभूमीवर तसेच पोलीस रेजिंग डे व रस्ता सुरक्षा अभियानाच्या अनुषंगाने उरण वाहतूक शाखेच्या वतीने संपूर्ण उरण शहर व  द्रोणागिरी, नवघर,भेडखळ परिसरात प्रभोधन पर कार्यक्रम व विशेष नाकाबंदी व तपासणी मोहीम आखण्यात आली असून कोणत्याही वाहनचालकाने मद्यप्राशन करून वाहन चालू नये व मद्य प्राशन करून वाहन चालविताना आढळून आल्यास संबंधितां विरुद्ध कठोर दंडात्मक कारवाई सोबतच त्यांचे वाहन जप्ती अथवा  वाहन परवाना निलंबन कारवाई करण्यात येईल असा इशारा देऊन,उरण शहर परिसरातील वाहन चालकांनी महामार्ग तसेच अंतर्गत रस्त्यावर वाहने चालवताना स्वतःचे व इतरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मोटर वाहन कायद्याचे पालन करावे असे आवाहन उरण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अतुल दहिफळे यांनी केले आहे.



Comments

Popular posts from this blog