आवाज कोकणचा / सिंधुदुर्ग
प्रतिनिधी
गेट-टुगेदर म्हणजे आनंद सोहळा - ॲड. दीप रत्नाकर सावंत..
कणकवली कॉलेज कणकवली सन 1985 ची बी. कॉम्. ची बॅच गेली सतरा अठरा वर्षे वर्षातून एकदा सर्व मित्र-मैत्रिणी एकत्र जमून गेट-टुगेदर सादर करत असतात. हे गेट टुगेदर साधारणपणे कोकणातच घेतले जाते.
यावर्षीचे गेट-टुगेदर कुणकेश्वर जवळील मिट मुंबरी या ठिकाणी अस्मि रेस्टारंट येथे आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे नियोजन संदीप मालपेकर व राजन पारकर या दोघांनी मिळून अति उत्कृष्ट रित्या केले होते. या गेट-टुगेदर मध्ये समावेश झालेल्या प्रत्येकाकडून सदर बाबतची प्रतिक्रिया देताना वर्षभराची एनर्जी आम्हाला प्राप्त होते असे सांगण्यात आले.
गेट-टुगेदर हे दोन दिवस व एक रात्र अशा रीतीने आयोजित करण्यात येते. हे गेट-टुगेदर म्हणजे सध्या 60 वर्षाच्या वरील मित्र मैत्रिणींचा आनंद सोहळा सादर केला जातो. त्यामुळे सर्वजण आनंदी, उत्साही, समाधानी दिसून येतात. या आयोजकांना मदत करण्यासाठी एडवोकेट रत्नाकर सावंत, दिलीप रासम इत्यादी सर्वजण साधारणपणे 32 मित्र-मैत्रिणींनी सहभाग नोंदविला होता.
Comments
Post a Comment