आवाज कोकण / नवी मुंबई 

पनवेल - प्रतिनिधी

पनवेल येथे मॅटी डे उत्साहात संपन्न...


इलेक्ट्रो होमिओपॅथी या पाचव्या विकसनशील चिकित्सा पद्धतीचे जनक सिजर मॅटी  यांची जयंती इलेक्ट्रो होमिओपॅथी प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे सदस्य व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत जल्लोषात साजरी करण्यात आली. 



पनवेल येथील सरोवर हॉटेलमध्ये झालेल्या या कार्यक्रमास असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांच्या मुख्य उपस्थितीत दीप प्रज्वलन व मॅटी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाला सुरुवात झाली.




वरिष्ठ सदस्य डॉ.  वैभव पाटील,  डॉ. सुनील मुंबईकर,  डॉ.  मनोज मयेकर , डॉ.  सुधीर  विश्वकर्मा,  डॉ. सुधीर केणी,  डॉ. संजय मोरे , डॉ. अनारुल इस्लाम , डॉ.  बी.  पटेल,  डॉ.  सुरेखा पाटील यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.



यावेळी उपस्थित सदस्यांना अध्यक्ष डॉक्टर अशोक म्हात्रे यांनी मार्गदर्शन करताना इलेक्ट्रोपॅथीच्या भविष्यातील वाटचालींबाबत चर्चा केली .



तसेच उपस्थित सर्व सदस्यांचा शाल , गुलाब पुष्प,  स्मृतीचिन्ह , पेन व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.




Comments

Popular posts from this blog