.ओ. के. एन्टरटेन्मेंट कराओके क्लब चे धूमधडाक्यात उद्घाटन.....

ओ. के. एन्टरटेन्मेंट कराओके क्लब चे धूमधडाक्यात उद्घाटन.....

रसायनी /अलंकार भोईर

                         दि.१२ जानेवारी राष्ट्रीय युवा दीन तसेच राजमाता जिजाऊ जन्मदिन आणि स्वामी विवेकानंद जयंती चा त्रिवेणी योग साधत "ओ. के. एन्टरटेन्मेंट "च्या "संगीत कराओके क्लब" चे उद्घाटन ग्रु. ग्रा. पंचायत मोहोपाडा (वासांबे) चे मा.सरपंच  आणि रसायनीचे धडाडीचे युवा नेतृत्व माननीय श्री संदीप शेठ मुंढे यांचे हस्ते करण्यत आले..

   प्रथम श्री गणेशाला वंदन करून दिप प्रज्वलन करण्यात आले, यानंतर रसायनी चे नाट्य-चित्रपट कलाकार श्री अलंकार भोईर यांनी आपल्या गोड आवाजात श्री गणेशाचे भक्तीगीत सादर केले.

     या कार्यक्रमासाठी रसायनी चे ज्येष्ठ रंगकर्मी माननीय 

श्री. कृष्णराव ओंकार, नाट्य अभिनेते श्री रवींद्र ओंकार, हॉल चे मालक श्री मोहीत गिध, श्री संतोष शेठ पाटील,श्री सुभाष जाधव, शिवदास जगताप, सुधीर शिंदे, भरत देशमुख, राजू अभ्यंकर, रमेश अंबुले, प्रकाश म्हात्रे, नंदू कुरंगळें,अनंता पाटील, पांडुरंग माळी, कुणाल जाधव, बाळाराम कुरंगळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते...

    या वेळी मा. सरपंच श्री संदीप शेठ मुंढे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले प्रत्येक कलाकारांमध्ये एक सुंदर असं मन असतं,पण आपलं मन जेंव्हा थकतं तेंव्हा मी स्वतः वेळ काढून एकांतात जुनी गाणी ऐकत असतो त्यामुळे जो मानसिक ताण असतो तो नक्कीच कमी होत असतो, याचा मी स्वतः अनुभव घेतला आहे, आपला रसायनी परिसर तसा एकतर शहरी ही नाही नी ग्रामीण ही नाही, त्यामुळे आपल्या परिसरात सुद्धा असे अनेक कलाकार लपलेले आहेत,मुंबई सारख्या शहरामध्ये असे अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध असतात पण अश्या लपलेल्या कलाकारांना संधी देण्यासाठी नरेश देवळेकर आणि त्यांच्या टीम ने हा कराओके क्लब उपलब्ध केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.. भविष्यात मी शंभर टक्के तुमच्या पाठीशी आहे आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो...

      या प्रसंगी ज्येष्ठ रंगकर्मी श्री कृ. रा. ओंकार यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले ... असं म्हणतात की आयुष्य जर समृद्ध करायचं असेल तर माणसाला कुठला तरी छंद असला पाहिजे.. नी छंद असा पाहिजे की, स्वतःला तर आनंद मिळालाच पाहिजे पण समोरचे जे श्रोते असतील त्यांनादेखील आनंद मिळाला पाहिजे. आज नरेशजी नी सुरू केलेल्या या स्तुत्य उपक्रमाला मी खुप-खुप शुभेच्छा देतो...

   या प्रसंगी ओके एन्टरटेन्मेंट चे संस्थापक श्री नरेश जी देवळेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले... ओके एन्टरटेन्मेंट ची स्थापना होऊन १० वर्ष झाली... आणि आता हा कराओके क्लब चालू करण्यामागचा हेतू फक्त गाण्याचे प्रोग्राम करणे नसून या माध्यमातून अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे हे आहे...  नवीन कलाकारांना संधी देणे हा माझा मुख्य उद्देश राहील.

श्री मोहित गीध यांनी हा हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल मी त्यांचा खुप खूप आभारी आहे,

या साठी तुम्हा सर्वांची अशीच साथ मला मिळावी ही अपेक्षा करतो.

 या नंतर श्री.शेखर मते ,श्री विष्णू जोगळेकर, श्री.अलंकार भोईर, श्री.संजू पाटोळे, विश्वनाथ गायकवाड, श्री. विवेक वावेकर, श्री.सुदेश म्हागावकर, श्री. सुहास अंबावणे, श्री संतोष चव्हाण, श्री.प्रताप गीते,विजय मुंढे, संतोष मुंढे, देवेश देवळेकर,रामदास अगीवले,

चेतना गोईटे, सायली सावंत,कु. अपूर्वा सोनावळे या

कलाकारांनी आपापली सुंदर गीते सादर केली . या कामी 

सौ. अनिता देवळेकर,कुमारी ओजस्वी आणि केऊर देवळेकर याची खुप मदत झाली .

Comments

Popular posts from this blog