आवाज कोकणचा / नवी मुंबई
केळवणे गावात प्रथमच छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा संपन्न
वार्ताहर पूजा चव्हाण
स्वराज्याचे संस्थापक, हिंदूंचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांचे ज्येष्ठ पुत्र , धर्म रक्षक, शंभुराजे अर्थात छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा १६ जानेवारी रोजी छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती तुळापूर, एकविरा कला क्रीडा सामाजिक आणि शैक्षणिक संस्था पनवेल आणि हिंदू जनजागृती समूह केळवणे यांच्या संयुक्त विद्यमाने हर्ष जल्लोष आणि मांगल्याने केळवणे गावात प्रथमच संपन्न झाला.
राज्याभिषेक सोहळा प्रारंभ सकाळी मुहूर्ताप्रमाणे ६ वाजून १५ मिनिटांनी सरपंच गुरुराज रामभाऊ ठाकूर/उपसरपंच सुवर्णा विनायक गावंड , जगदीश ठाकूर, बालकृष्ण पाटील, पाटील गुरुजी व गजानन महाराज यांच्या श्री व सौ या जोड्यांच्या हस्ते सुरू झाला.
महाराजांवर पुष्पवृष्टी सद्गुरु नरेंद्र महाराज सांप्रदाय केळवणे, श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान बैठक परिवार केळवणे, तसेच ह भ प सांप्रदाय केळवणे, यांनी केली.
जाणता राजा ग्रुप आणि छत्रपती शिवाजी महाराज नवीन पुतळा कमिटी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण केले.
ऋषिकेश ठाकूर, आस्वाद शिवकर, नंदकुमार गावंड, सुशील ठाकूर, विलास ठाकूर आणि अजय शिवकर यांच्या श्री व सौ या जोड्यांनी
छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले.
विक्रांत घरत, विश्वास शिवकर, किरण कोळी, ओंकार म्हात्रे, राजेश कोळी यांच्या श्री व सौ या जोड्यांनी ध्वज पूजन केले.
ज्ञानेश्वर घरत जगन्नाथ शिवकर, नरेश पाटील, ग.बा पाटील गुरुजी यांच्या श्री व सौ जोड्यांनी छत्रपती संभाजी महाराज मंचकारोहन ( सिंहासनाचे) पूजन केले.
प्रतिश पाटील, रिधेश पाटील, रवींद्र पाटील , सागर ठाकूर संजय पाटील यांच्या श्री व सौ या जोड्यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे पूजन केले.
तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना श्रीफळ वाढण्याचा मान गावदेवी भवानी आई तीन आसनी चालक-मालक संघटनेला तर छत्रपती संभाजी महाराजांना श्रीफळ वाढण्याचा मान गावदेवी भवानी आई मिनिडोर चालक-मालक संघटनेला मिळाला.
समीर कोळी ,धर्मेंद्र घरत, दत्तात्रेय माली, दत्तात्रेय पाटील, नंदकुमार ठाकूर याच्या श्री व सौ जोडीने मशाल पूजन केले.
गुरुनाथ गावंड आणि चैतन्य पाटील या शिवशंभूच्या मावळ्यांना मशाल फिरवण्याचे सौभाग्य मिळाले.
यावेळी चित्रकार गिरीश मारुती घरत यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात गावातील कित्येक तरुण वर्ग लहान थोर सर्वांनी भाग घेऊन कार्यसंपन्न केले.
विशेष म्हणजे या संपूर्ण सोहळ्याचे नियोजन TP तेजस पाटील यांनी उत्कृष्ट पणे केले.
कार्यक्रमाची सांगता महाराष्ट्र गीताने झाली.
Comments
Post a Comment