आवाज कोकणचा / नवी मुंबई
पनवेल प्रतिनिधी
लिटल चॅम्प्स शाळा दापोली येथे डॉ. अशोक म्हात्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न
पनवेल जवळील दापोली येथील लिटल चॅम्प्स शाळेत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते हा ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला.
संस्थेचे चेअमन धनाजी वास्कर, सेक्रेटरी मिलिंद वास्कर, संस्थेचे सदस्य सुभाष पाटील या कार्यक्रमासाठी विशेष मान्यवर म्हणून उपस्थित होते. ग्रामीण भागामध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून विद्यार्थी घडविणे ही तशी अवघड बाब आहे परंतु शाळेच्या मुख्याध्यापिका प्रीती वास्कर यांची दूरदृष्टी व विद्यार्थ्यांप्रती आपुलकीचे नाते यामुळे या शाळेतील विद्यार्थी होतकरू व उच्च गुणवत्ता धारण करत असल्याचे त्यांनी राबवलेल्या उपक्रमातून दिसून येते.
पुरातील पुरातन काळ ते आत्ताची अत्याधुनिक घरे याच्यातील बदल दाखवणारे घरांचे विविध प्रकार, रस्ते सुरक्षा या विषयावरील अद्ययावत माहिती, ऊर्जा स्रोत, हॉस्पिटल , अग्निशमन दल यांची कार्यप्रणाली, एटीएम मशीन यासारखे वेगवेगळ्या विषयांवर मॉडेल मांडणी करून भविष्यातील वाटचालीची चुणूक दाखवली.
यावेळी बोलताना डॉ. अशोक म्हात्रे यांनी मुख्याध्यापिका व त्यांच्या सहकारी यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल गौरव उद्गार काढले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या शाळेतून बाहेर येणाऱ्या विद्यार्थी हा आधुनिक जगाला मार्ग दाखवण्यासाठी तयार होईल तसेच समाजामध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Comments
Post a Comment