आवाज कोकणचा / नवी मुंबई
प्रतिनिधी
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शाळेतर्फे ध्वजारोहण संपन्न ...
तुर्भे येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या शाळेने विभागातील कम्युनिटी हॉल येथे आपल्या विद्यार्थ्यांसह ध्वजारोहण सोहळा पार पडला .
शाळेच्या मुख्याध्यापिका मीराबाई रामचंद्र जाधव , प्रभाग अध्यक्ष कविता पाटील , जिल्हा अध्यक्ष जगदीश पाटील , शिक्षक वृंद वंदना अंबवले राणी दळवी महानंदा कांबळे रेखा पंडित यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाची मदत केली.
या शाळेचे चिमुकले विद्यार्थी आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विशेष पोशाख घालून आले होते या बालमनावर खऱ्या अर्थाने संस्कार घडविण्याचे व एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संस्कृती देण्याची जबाबदारी या शाळेच्या शिक्षिका नेहमीच करत असतात.
ज्यामुळे या विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल होईलच शिवाय देशाला देशभक्तीमध्ये समरस झालेले नागरिक मिळतील अशी अपेक्षा आहे.
Ek Number
ReplyDelete