आवाज कोकणचा / नवी मुंबई
पनवेल - प्रतिनिधी, दिनांक २७ जानेवारी
बी. आय.एस. आणि एल.सी.ई.एम. शाळेचा 10 वा वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण सोहळा जल्लोषात साजरा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव....
दापोली पनवेल येथील बी. आय. एस. आणि एलसीईएम संस्थेच्या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल येथे मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला.
भारत की धरोहर हमारी संस्कृती हमारी सभ्यता या विषयावर आधारित या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच आपली भारतीय संस्कृती व परंपरा पुढील पिढीकडे जाऊन त्या जपल्या जाव्यात या अनुषंगाने या कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ प्रीती वास्कर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते.
विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात (भारत की धरोहर) या विषयावर भारतातील विविध राज्यांचे प्रदर्शन करण्यात आले. त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रदर्शन इयत्ता ३ रीच्या विद्यार्थ्यांनी तसेच, मणिपुर, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, तमिळनाडू, पंजाब, बंगाल, राजस्थान गोवा, गुजरात आंध्रप्रदेश, झारखंड अशा सर्व राज्यांचे प्रदर्शन नृत्य कलेच्या माध्यमातून उत्तमरीत्या मांडले. आपल्या देशाची एकता, सभ्यता संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न BIS and LCEM स्कूल ने अतिशय उत्कृष्टपणे केला आहे
संस्थेचे अध्यक्ष धनाजी एकनाथ वास्कर , प्रमुख पाहुण्या सौ. प्राजक्ता गंगल भाटकर (समुपदेशक, बी.ए.एम.स्व.मास्टर इन सोशल वर्क ) श्रीमती जाई जगताप (प्राचार्य, आदर्श शिक्षण प्रशिक्षण संस्था) तसेच समाधान घोपरकर - सरपंच - दापोली , रूपेश गायकवाड सरपंच - ओवळेसदाशिव वास्कर सरपंच- कुंडेवहाळ यांची उपस्थिती या समारंभासाठी होती.
तसेच Brainobrain-Owale-ulwe या International Brainobrain Abacus च्या students नी आपल्या सादरीकरण मधून उपस्थितांची मने जिंकली .
यामध्ये Addition - Subtraction. Multiplication, Division या सर्व Concept Multitasking मधून करून Calculator सारखे accurate करून दाखवले.
यामध्ये सीनियर केजी चा विद्यार्थी दिव्यम , इयत्ता दुसरीचा विद्यार्थी मानस कोळी, इयत्ता चौथीचे शर्विन , हर्षीका पाटील, कृषीका म्हात्रे, प्रियल गुजरे या सर्वांनी आपल्या बुद्धिमत्तेचे प्रदर्शन दाखवून उपस्थितांची मने जिंकली.
Comments
Post a Comment