आवाज कोकणचा / अलिबाग

प्रतिनिधी

डिफेन्स अकॅडमी तर्फे ४३५ आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय वस्तू व क्रिडा साहित्याचे वाटप

    


     २६ जानेवारी २०२५ , प्रजासत्ताक दिनानिमित्त डिफेन्स अकॅडमी अलिबाग कडून कोलघर येथील आदिवासी आश्रम शाळेतील सुमारे ४३५ विद्यार्थ्यांना शालेय तसेच खेळाच्या सामानाचे वाटप करण्यात आले.


 अशा प्रकारचे  सामाजिक उपक्रम डिफेन्स अकॅडमी कडून वारंवार होत असतात.तसेच अकॅडमी च्या विद्यार्थ्यांनी सदर मोहिमेत सहभाग घेऊन शालेय वस्तू दिल्या. मुलांना समाज सेवेची जाणीव व्हावी व मानवता धर्म रुजावा ह्या हेतूने अकॅडमी मार्फत सामाजिक उप्रकम राबविले जातात.



     सदर उपक्रमात डिफेन्स अकॅडमी चे संस्थापक श्री.समरेश शेळके, संस्थापक सनी शेलार आणि अनिकेत म्हामुणकर, को- मास्टर प्रणय म्हात्रे, प्रशिक्षक अक्षय पाटील,अमिषा भगत आणि सागर हिसालके सोबत अकॅडमी चे विद्यार्थी उपस्थित होते.



Comments

Popular posts from this blog