आवाज कोकणचा / नवी मुंबई
निरपेक्ष पत्रकारितेचे कौतूक म्हणजे शाब्बासकीची थापचं - डॉ.अशोक म्हात्रे
पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्रचा पत्रकार दिन उत्साहात संपन्न.
पनवेल ( सुधीर पाटील)
पत्रकार समाजाचा आरसा असून त्यांनी आपल्या धारदार लेखणीने चांगल्या बातम्या लिहाव्यात. पत्रकारांच्या कार्याचा आणि निरपेक्ष पत्रकारितेचे कौतूक करणे म्हणजे शाब्बासकीची थापत असते असे मत पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ.अशोक म्हात्रे यांनी केले.
पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र आयोजित पत्रकारदिना निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. नवीन पनवेल येथील नील हॉस्पिटलच्या सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात रायगड जिल्हा कांदळवन अधिकारी साईश्वरी पडवळ, प्रा.डॉ.भाग्यश्री भोईर, डॉ. सुभदा नील , महिला उत्कर्ष समिती प्रदेश सचिव ॲड. दिव्या लोकरे, भागवत कथाकार ज्ञानेश्वर बर्वे महाराज,भक्ती बर्वे ताई,
राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित शिक्षिका मंगला गडमुळे आदी मान्यवर तसेच पत्रकार उत्कर्ष समितीचे रायगड जिल्हा अध्यक्ष मिलिंद खारपाटील, प्रदेश उपाध्यक्ष राम जाधव, प्रदेश सदस्य ज्ञानेश्वर कोळी, दिलीप गायकर, प्रदेश सचिव डॉ.वैभव पाटील, प्रदेश खजिनदार शैलेश ठाकूर, अलंकार भोईर, लालचंद यादव, गुरुनाथ तिरपणकर, अशोक घरत, नवी मुंबई अध्यक्ष निलेश उपाध्याय, संतोष जांभळे, आदित्य वाघ, अरुण चवरकर, अमोल एरनकर, महिला उत्कर्ष समिती नवी मुंबई कार्याध्यक्ष वर्षा लोकरे, उरण अध्यक्ष रंजना म्हात्रे आदी सदस्यांसह ऋषिकेश थळे,सुभाष वाघपंजे आदी पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात ज्ञानेश्वर महाराज यांनी सांगितले की, पत्रकारांनी सकारात्मक पत्रकारिता करावी.जगातील पहिले पत्रकार नारद मुनी होते. त्यांनी योग्य सकारात्मक उपदेश केल्याने वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाले.डॉ.सुभदा नील यांनी यावेळी आरोग्य विषयक मार्गदर्शन केले. मिलिंद खारपाटील , डॉ.अशोक म्हात्रे यांचे त्यांनी विशेष कौतूक केले. पत्रकारांचे कौतूक करताना त्या म्हणाल्या,'पत्रकार हे देवदूत आहेत'.
आपल्या लेखणीच्या माध्यमातून अन्यायाला वाचा फोडत समाजहित, सामाजिक प्रबोधन व लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला सशक्त करण्यासाठी गेली अनेक वर्ष भरीव योगदान देणाऱ्या पत्रकार बंधू भगिनींचा यावेळी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. त्यामध्ये अनिल कुरघोडे,संजय कदम, दीपक घोसाळकर,निलेश म्हात्रे, मयूर तांबडे, सुनील कटेकर, आरती पाटील,भरत कुमार कांबळे,धनाजी घरत, जगदीश भोईर,रणिता ठाकूर, सुजाता होळकर, सुधीर पाटील यांचा समावेश होता.
सदर कार्यक्रमात अलंकार भोईर यांनी आपल्या गोड आवाजात भक्ती गीते सादर केली तर अशोक घरत यांनी कविता सादर केल्या. सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांनी केली तर सूत्रसंचालन अक्षय पाटील यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
Comments
Post a Comment