लिटिल आयडल किड्स स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न...

 लिटिल आयडल किड्स स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न...

पनवेल..मिलिंद खारपाटील

      लिटिल आयडल किड्स स्कूल  नवीन पनवेल हे स्नेहसंमेलन पनवेल मधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे शुक्रवार दिनांक 24 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

सदर कार्यक्रमाला आवाज महामुंबई चा चॅनेल चे  संपादक मिलिंद खारपाटील,महाराष्ट्र लोक कल्याण कारी सेवा संस्थेचे संस्थापक एन डी खान, मुंबईचे माजी पोलीस सहायुक्त एकनाथ खोलम,साप्ताहिक शिव सम्राट चे संपादक रत्नाकर पाटील, दीपक शेट्टी,रांजिता पाटील,अंजनी सराफ आदी मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रगीत, दिप प्रज्वलन यानंतर छोट्या छोट्या बच्चे कंपनीने सुरेख नृत्य करून टाळ्या, शिट्या मिळवल्या आणि अनेक वेळेस वन्स मोअर ची मागणी रसिक प्रेक्षकांनी केली.सायंकाळी 4 वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात रात्रीचे 7 वाजून कसे गेले हे समजलेच नाही. खचाखच  भरलेल्या या नाट्यगृहात रसिक प्रेक्षक, पालक वर्गाला अक्षरशः खुर्चीला खिळवून ठेवले होते.

गेल्या 10 वर्षात विद्यार्थी आणि पालक यांचा प्रतिसाद चांगला असल्याचे पूनम गुप्ता मॅडम यांनी सांगितले



हे वार्षिक स्नेसंमेलन यशस्वी करण्यासाठी प्रिन्सिपॉल पूनम गुप्ता,चेअरमन मनोज गुप्ता, शिक्षिका शीतल भर्मा, जयीता करमरकर, मृणाल पवार,पूनम वर्मा,उर्मिला, स्वाती ,सुजाता ,क्षमा या सर्वांनी विशेष मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला

कार्यक्रमाचे सुरेख सूत्र संचालन  शिवांगी  तिवारी यांनी केले.



Comments

Post a Comment

Popular posts from this blog