आवाज कोकणचा / नवी मुंबई
उरण / प्रतिनिधी
रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत पेनिसिया हॉस्पिटल , पत्रकार उत्कर्ष समिती व इन्नर व्हील क्लब तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न...
पत्रकार उत्कर्ष समिती पॅनेसिया हॉस्पिटल व इनरव्हील संस्था नवीन पनवेल यांच्यातर्फे रस्ते सुरक्षा सप्ताह कार्यक्रमांतर्गत न्हावा शेवा वाहतूक पोलीस शाखा व उरण वाहतूक पोलीस शाखा येथील कर्मचाऱ्यांसाठी पोलीस बंधू भगिनींसाठी संपूर्ण आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी पेनिसिया हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर सुभाष सिंग पत्रकार उत्कर्ष समिती अध्यक्ष डॉक्टर अशोक म्हात्रे न्हावा शेवा पोलीस ठाण्याचे वाहतूक विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुजावर उरण वाहतूक शाखा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दहिफळे, त्या दिवशी हॉस्पिटलचे डायरेक्टर शरद गुप्ता, इनरव्हील संस्थेच्या ममता गुप्ता याप्रसंगी उपस्थित होते.
यावेळी न्हावा व उरण वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली.
यावेळी रक्तदाब रक्तातील साखर यासह विविध तपासण्या मोफत करण्यात आल्या साधारण पन्नास हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांनी या तपासणीचा लाभ घेतला.
यावेळी बोलताना डॉ. सुभाष सिंग म्हणाले की ग्रामीण भागातील जनतेला अल्प दरात आधुनिक वैद्यकीय सुविधा मिळाव्यात तसेच या विभागांमध्ये वाहनांची मोठी वर्दळ असल्यामुळे अनेक वेळा गंभीर अपघात होत असतात ज्यात अनेक निरप्रात जीवांचा बळी जात असतो किंवा जन्मभरासाठी जायबंदी होतात अशा अपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय मदत मिळाली तर त्यांचे प्राण वाचू शकतात व अनेक कुटुंबे उध्वस्त होण्यापासून वाचू शकतात.
Comments
Post a Comment