आवाज कोकणचा रायगड
वार्ताहर - अलंकार भोईर
ISPL स्पर्धेत रजत मुंढे ची सर्वोत्तम खेळी
कुटुंबाने केला जल्लोषात वाढदिवस साजरा.....
राष्ट्रीय स्तरावर खेळल्या जाणाऱ्या ISPL स्पर्धेत, अमिताभ बच्चन oner असलेल्या "माझी मुंबई" या संघातून खेळत असलेल्या आणि बँगलोर स्ट्रायकर्स विरूद्ध झालेल्या मॅचमध्ये ३२ चेंडू मधे ५८ धावांची बहारदार खेळी करून रजत मुंढे याने सामनाविराचा किताब पटकावला.
एका सामान्य कुटुंबातून जन्मलेल्या आणि चांभार्ली सारख्या छोट्याशा गावातून नावारूपास आलेल्या रजत मुंढे यांची खेळी दिवसेंदिवस प्रगती पथावर आहे. ISPL सारख्या नावाजलेल्या स्पर्धेत तो सध्या व्यस्त आहे.
दि.30 जानेवारी त्याचा वाढदिवस आणि त्याने पटकावलेला सामनाविराचा किताब..(३२ चेंडू ५८ धावा.) याचे औचित्त साधत त्याच्या संपूर्ण कुटुंबाने गावातील प्राथमिक शाळेत साजरा केला. यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग आणि गिफ्ट चे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी चांभार्ली गावचे विद्यमान सरपंच श्री.प्रतीप शंकर पाटील उपस्थित होते.. ते आपल्या भाषणात म्हणाले की रजत मुंढे याने आपल्या कमी वयात एवढी मोठी प्रगती केली आहे की कोणी विसरू शकणार नाही. आज आपल्या गावाचं नाव राष्ट्रीय पातळीवर गाजवला आहे, याचा मला आपल्या गावकऱ्यांना अभिमान आहे,अशीच त्याची उत्तरोत्तर प्रगती होऊन त्याचं आणि आपल्या गावाचं नाव रोशन करावं ही सदिच्छा व्यक्त करतो.
या वेळी रजत चे काका श्री. महादेव मुंढे, श्री.कमलाकर मुंढे, वडील श्री.काशिनाथ मुंढे, श्री विजय मुंढे, श्री. संतोष मुंढे, कुमार अनिकेत मुंढे, सुजल मुंढे महिलांमध्ये सौ. मंजुळा मुंढे, सौ.मुक्ता मुंढे, सौ. प्रमिला मुंढे, सौ. रुपाली मुंढे, सौ. सानिका मुंढे, सौ. संजना मुंढे आणि वर्गशिक्षिका सौ. मेघना झिराळकर, स्मिता पाटील व ताराबाई जांभळे यांच्या शुभहस्ते गिफ्ट चे वाटप करण्यात आले.
Comments
Post a Comment