
आवाज कोकणचा / नवी मुंबई उरण - वार्ताहर / पुजा चव्हाण आमसभेत घेतलेल्या समस्यांवर निवारण होणार काय जनतेचा प्रश्न?...... विविध समस्या सोडविण्याचे आमदार महेश बालदी यांचे आश्वासन अधिकाऱ्यांनीही दिले समस्या सोडविण्याचे आश्वासन तब्ब्ल २०१८ नंतर २०२५ साली आमसभा आयोजित नागरीकांच्या समस्या सुटणार की तशाच राहणार याकडे जनतेचे लक्ष उरण दि २८ नागरिकांच्या विविध समस्या, प्रश्न सोडविण्यासाठी दरवर्षी आमसभेचे आयोजन केले जाते. मात्र उरण तालुक्यात २०१८ नंतर एकदाही आमसभा घेण्यात आली नाही. मात्र जनतेने आमसभा घेण्याची वारंवार मागणी केली होती. पत्रकारांनीही वेळोवेळी याबाबत आवाज उठविला होता. शेवटी नागरिकांचे वेगवेगळे प्रलंबित प्रश्न, विविध प्रकल्प, विविध कामांना होणारा उशिर, विविध प्रकल्प राबविण्यात येणारे अडथळे, शासकीय सेवा योजना राबविताना येणाऱ्या अडचणी आदी समस्या लक्षात घेता जनतेच्या मनाचा कौल घेत उरण पंचायत समिती तर्फे २८ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या वेळेत जेएनपीटी मल्टीपर्पज हॉल , टावूनशिप, उरण येथे आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली ज...