आवाज कोकणचा / पेण
वार्ताहर - अरुण चवरकर
तारामती टाॅवर पेण माघी गणेशोत्सवाला माजी नगराध्यक्षा प्रितम ताई यांची भेट...
पेण तालुक्यातील तारामती टाॅवर मध्ये माघी उत्सव थाटामाटात संपन्न तारामती टाॅवर मधे सर्व उत्सव साजरे करतात.
आपल्या भावी पिढीला उत्सवांची माहिती जतन करून पुढे ती प्रथा चालू रहावी त्यातील माघी गणेशोत्सवाला सर्व मुंबई, पुणे येथे राहणारे सर्व सभासद
आपली कामे सोडून एकत्रीत कार्यक्रमाला येऊन महाप्रसादाचा लाभ
घेऊन कार्यक्रमाला हातभार लाऊन संध्याकाळी आपल्या मुलांच्या अंगातील कला गुणांना वाव देण्यासाठी त्यांना प्रोत्साहन पर बक्षीस देऊन गौरविण्यात येते .
ह्याच कार्यक्रमाला पेण च्या माजी नगराध्यक्षा प्रितमताई पाटील यांनी भेट देऊन तारामती टाॅवर मधील सर्व महिलांना 05/02/2025 रोजी भारतीय जनता पक्ष यांनी हळदी कुंकू कार्यक्रमाच निमंत्रण दिले आहे.
Comments
Post a Comment