आवाज कोकणचा / नवी मुंबई 

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत वाहन  व मोबाईलचोरी करणारे अखेर जेरबंद..



उरण/पूजा चव्हाण

         कोणताही प्रत्यक्षदर्शी  पुरावा नसताना केवळ तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी व अधिकाऱ्यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चोरीच्या  गुन्ह्याचा कौशल्यपूर्ण तपास करून दोन चोरांना जेरबंद केले आहे.



सखोल चौकशी अंती  सदरच्या  आरोपीवर वेगवेगळ्या पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे 

हे दोन्ही चोरटे उरण तालुक्यांतील आहेत. पोलीस तपासाअंती चोरीचे मोठे घबाड उघडकीस आल्याने तपासात कोणताही कसूर न करता आरोपींना अटक केल्याने जनमानसांतून  पनवेल तालुका पोलीसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.


        पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार 30 जानेवारी 2025 रोजी सर्वसाधारणपणे रात्रो 10 : 00 ते 31 जानेवारी 2025 सकाळी 8 :30 या वेळेत  यज्ञ अपार्टमेंट, ओम् ट्रेडर्स दुकानासमोर डेरवली गाव, ता.पनवेल, जिल्हा रायगड याठिकाणी पार्किंग करून ठेवण्यात आलेली महेंद्र कंपनीची पिकप गाडी क्र.एमएच 46 ई 3950 ही एका अज्ञात चोरट्याने चोरी करून नेली या नंतर पिकप मालकाने या घटनेची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात केली असता सदरचा गुन्हा पोलीस ठाण्यात गु.रजी. नं.26/2025 अन्वये बी.एन.एस.कलम 303 (2) प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.

         सदरच्या तपास पथकांतील अधिकाऱ्यांनी वरिष्ठांच्या  मार्गदर्शनाखाली कोणताही प्रत्यक्षदर्शी पुरावा हाती नसताना तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे या गुन्ह्याचा कौशल्यपूर्ण तपास करूनआरोपींना जेरबंद केले .



या गुन्हांतील आरोपी 1) कौशल्य श्रीरंग पाटील वय वर्ष 22 हा उरण तालुक्यांतील मु.पाणदिवे, पो.कोप्रली, ता. उरण, जिल्हा रायगड येथील असून व्यवसायाने तो चालक आहे तर  आरोपी क्र. 2) रणजीत रामप्रकाश सोनी वयवर्ष 36 हा सुद्धा व्यवसायाने चालक असून मु.पाणदिवे,   पो.कोप्रली, ताउरण, जिल्हा रायगड येथे राहतो तो मुळचा रा.बढीयानाका, खुटला, बांदा, उत्तर प्रदेश येथील आहे. 



या दोन्ही आरोपींना  4फेब्रुवारी 2025 रोजी रात्रो 10:31 मिनिटांनी या गुन्ह्याच्या संदर्भात अटक करण्यात आले आहे. आरोपींना 7 फेब्रुवारी 2025 पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. 


          अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून   2,50,000/-रु. किमतीची एक पांढऱ्या रंगाची महेंद्र पिकप बलेरो MH 46 E 3950, 2) 50,000/- रु.किमतीची काळ्या-पिवळ्या रंगाची रिक्षा क्र. MH 46 AZ7226 न्हावा-शेवा पोलीस ठाणे उरण येथे गु.रजी.क्र.10/2025 बी.एन.एस 303(2), 27/1/2025 मधील, 3)40,000 रु.किमतीची होंडा ॲक्टिवा स्कुटी क्र. MH 46 CF 9523, गुन्हा नोंद पनवेल शहर पोलीस  ठाणे गु.रजी.क्र.43/2025, बी.एन.एस 303(2),30/1/2025 या गुन्ह्यातील, 4)40,000/-रु. रु.किमतीची एक हिरो फॅशन प्रो कंपनीची काळ्या रंगाची मोटार सायकल क्र. MH 46 AV5081, तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा ,रजी,क्र.50/2025 बी.एन.एस 305 दि.4/2/2025 आदि वाहनांसोबतच सुमारे    5000/-रु.किमतीचा रणजीत रामप्रकाश सोनी याच्या ताब्यात सापडलेला काळ्या रंगाचा OPP कंपनीचा फोन मॉडेल नं.CPH2579 आय.एम.ई.आय.नंबर 864214061018836,  864214061018828 त्यात सीमकार्ड नसलेला मोबाईल फोन तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा,रजी,क्र.50/2025 बी.एन.एस 305 दि.4/2/2025,  (6) 5000/-रु.कीमतीचा आरोपी रणजीत सोनी याच्या ताब्यात मिळालेला OPP A38 कंपनीचा मोबाईल फोन ( 7) 5000/- रु. किमतीचा निळ्या रंगाचा मोटरोला कंपनीचा दोन कॅमेरे असलेला मोबाईल फोन, (8) 5000/- रु किमतीचा निळ्या रंगाचा रेडमी कंपनीचा तीन कॅमेरेअसलेला मोबाईल फोन,(9)5000/- रु किमतीचा जांभळ्या रंगाचा व्हिओ कंपनीचा दोन कॅमेरे असलेला मोबाईल फोन, अश्या प्रकारे 4,0,5000/- रुपये एकूण किमत असलेला सदर आरोपीने न्हावा-शेवा , पनवेल शहर, तळोजा पोलीस ठाणे हद्दीत केलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहेत.

           या गुन्ह्यातील आरोपी कौशल्य श्रीरंग पाटील उरण तालुक्यांतील मु.पाणदिवे, पो.कोप्रली,ताउरण, जिल्हा  रायगड येथील असून त्याच्यावर न्हावा-शेवा   पोलीस ठाण्यात एकूण 5 गुन्हे, उरण पोलीस ठाण्यात  3, पनवेल पोलीस ठाण्यात 4 गुन्हे वेगवेगळ्या तारखांना दाखल करण्यात आले आहेत तर रणजीत रामप्रकाश सोनी याच्यावर  पंचवटी पोलीस ठाणे नाशिक येथे व तळोजा पोलीस ठाणे रायगड येथे गुन्ह्याची नोंद आहे. या गुन्ह्याचा  तपासउघडकीस आणण्याच्या दृष्टीने   पनवेल विभागाचे स.पोलीस आयुक्त अशोक राजपूत, यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ  पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या नेतृत्वाखाली पनवेल पोलीस ठाण्याचे आनंद कांबळे पो. नी. (गुन्हे), सपोनि अनुरुद्ध गिजे, पो. उपनी हर्षल राजपूत, पोहवा/ 160 विजय देवरे, पोहवा /2700 सुनील कुदळे,पोह. /569 महेश धुमाळ,पोह. /1857 शिवाजी बाबर,पोह. / 2042 सतीश तांडेल, पोशी/12340 राजकुमार सोन कांबळे,पोशी /3869 आकाश भगत ,पोशी/3613 भीमराव खताळ यांनी परिश्रमपूर्वक मेहनत घेऊन केवळ तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे या दोन्ही चोरांना जेरबंद केले आहे.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog