आवाज कोकणचा / नवी मुंबई

उरण पोलिसांची कामगिरी कौतुकास्पद 

      मोटार सायकल चोरी करणारे आरोपी जेरबंद


उरण / पूजा चव्हाण

             सातत्याने गजबजलेल्याउरण तालुक्यात विशिष्ठ प्रकारे गुन्हे पद्धतीचा वापार करून आरोपी हे जेएनपीए परिसरांतील वेअर हाउसच्या भिंतीलगत बाहेरील बाजूस पार्किंग करून ठेवण्यात आलेल्या मोटार सायकलची चोरी करीत असत अखेर या अट्टल मोटार सायकल चोरांना उरण पोलिसांनी तांत्रिक विश्र्लेषण व मिळालेल्या माहितीच्या आधारे दोन व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्या कडुन आत्तापर्यंत 6 गुन्हे  उघडकीस आणले असून विविध कंपनीच्या 6 मोटार सायकल हस्तगत केल्या आहेत .


त्यांची अंदाजे किंमत 1 लाख 80 हजार रु. इतकी आहे.उरण पोलिसांची तत्परता आणि गुन्ह्याची केलेली उकल यामुळे उरण पोलिसांवर कामगिरी कौतुकाचा वर्षाव होत आहे. 


               पोलीस अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या गुन्ह्यात आरोपी क्र.1) शरद भारत सांगोलकर(वय 29 वर्षे),रा. साईबाबा मंदिराच्या पाठीमागे मु. नवघर,ता.उरण,जि.रायगड,मूळ,रा.वाकी-घेरडी, ता.सांगोला, जि.सोलापूर,व आरोपी क्र.2) संजय तमा निमगरे(वय 34वर्षे) रा. साईबाबा मंदिराच्या पाठीमागे मु. नवघर ता.उरण जि.रायगड, मूळ  रा.वाकी-घेरडी, ता.सांगोला, जि.सोलापूर यांना अटक केल्या नंतर त्यांची कसून चौकशी केली असता , उरण पोलीस ठाणे येथे गुन्हा.राजी.क्र.07/2025,गुन्ह्यातील मोटार सायकल क्र.MH 05 CS 6544, गुन्हा.राजी.क्र 08/25,मधील MH 46 AW 1177 ,गुन्हा.राजी.क्र       282/24, मधील MH 24 BA 3846, गुन्हा.राजी.क्र  331/2024 मधील MH 46 BT 9972 आणि  पनवेल पोलीस ठाणे येथे गुन्हा.राजी.क्र 08/2024 या गुन्ह्यांतील मोटार सायकल क्र.MH46 AY1959  या गाड्यांची उकल झाली आहे.तर सदरच्या आरोपी कडुन एक हिरो होंडा स्लेनडर इंजिन क्र.03A18M23221 मोटारसायकल संदर्भात RTO कार्यालयाकडे पत्रव्यवहार करून तपास करण्यात येत आहे. या सर्व गुन्ह्यांची नोंद भा.न्या.सं.2023 चे पोह्वा कलम 303(2),3 (5) अन्वये नोद आहे.


            सदरच्या गुन्हे तापस कामी परीमंडळ-2 पनवेलचे  पोलीस उप आयुक्त प्रशांत मोहिते,पोर्टविभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल नेहुल नवी मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ.आणि त्यांचे सहकारी उरण पोलीस ठाण्याचे सपोनिनितीन खाडे,पोउपनी संजय राठोड,पोह्वा/3518अधिकारी, पोह्वा/1341ठाकूर, पोह्वा/967 पाटील. पोह्वा/1987 भगत, पोह्वा/2138 फंड, पोह्वा/1950 शिंपी, पोह्वा/1744 घरत,पोशी/3048 माळशिकारे,पोशी/12024शेख, पोशी/3950 भोर्जेया सर्वांनी अथक प्रयत्न करून गुन्हे उघडकीस आणले आहेत व पोलीस कस्टडी रीमाड घेऊनसदर आरोपी कडून अधिकाधिक गुन्हे उघडकीस आणण्याचा  प्रयत्न करीत आहेत त्यंच्य या कामगिरी बबत उरण पोलिसांवर कामगिरी कौतुकाचा वर्षाव होत आहे.



Comments

Popular posts from this blog