आवाज कोकणचा / नवी मुंबई

प्रतिनिधि/ उलवे

पत्रकार उत्कर्ष समिती तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस व समाजातील विविध स्तरातील भगिनींचा सन्मान....

पत्रकार उत्कर्ष समिती या राज्यस्तरीय पत्रकार समितीच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रभरात विविध कार्यक्रम राबविण्यात आले . पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन राज्यभरात करण्यात आले होते .


पत्रकार उत्कर्ष समिती अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीने यासाठी पुढाकार घेतला होता.



नवी मुंबई मधील उलवे पोलीस ठाणे येथील महिला पोलीस भगिनींचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. 



महिला उत्कर्ष समिती प्रदेश सचिव ॲड. दिव्या लोकरे, नवी मुंबई अध्यक्ष सुजाता कडू, सदस्य श्वेता तांडेल, कार्याध्यक्ष वर्षा लोकरे यांचे मोलाचे सहकार्य या कार्यक्रमासाठी लाभले. 



नवी मुंबई सदस्य डॉ. अश्विनी देशमुख यांच्या मॅग्नस हॉस्पिटल नवी मुंबई येथे महिलांसाठी गर्भाशयाचा कॅन्सर तपासणी व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विभागातील महिलांनी मोठ्या प्रमाणावर या आरोग्य शिबिराचा लाभ घेत आपली तपासणी करून घेतली .

उरण तालुका अध्यक्ष सौ. रंजना म्हात्रे यांनी तेथील विविध समूहातर्फे आयोजित स्तनाचा कर्करोग आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. 

यासह नवी मुंबई तुर्भे विभाग, कणकवली, सिंधुदुर्ग, पुणे, रत्नागिरी, अकोला व इतर ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन पत्रकार उत्कर्ष समिती व महिला उत्कर्ष समितीच्या माध्यमातून करण्यात आले होते.

यावेळी पत्रकार उत्कर्ष समिती तर्फे महिला उत्कर्ष समितीच्या उपस्थित सदस्य व पदाधिकाऱ्यांचा सन्मान अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांचे हस्ते करण्यात आला

Comments

Popular posts from this blog