आवाज कोकणचा/ नवी मुंबई
प्रतिनिधि - पनवेल
तेजस्विनी महिला ग्राम संघाच्या नूतन कार्यालयाचा उद्घाटन सोहळा व वार्षिक स्नेहसंमेलन कुंडे वहाळ येथे संपन्न....
8 मार्च जागतिक दिनाचे औचित्य साधून कुंडेवहाल गावात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत तेजस्विनी महिला ग्राम संघाच्या नूतन कार्यालयाचा उद्घाटन सोहळा व वार्षिक स्नेहसंमेलन सभा थाटामाटात पार पडला .
शनिवार दिनांक 8 मार्च 2025 रोजी सकाळी 10:00 वाजता जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आमदार माननीय श्री महेश शेठ बालदी साहेब यांच्या आमदार निधीतून बांधण्यात आलेल्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन माननीय श्री समीर वाठारकर गट विकास अधिकारी पंचायत समिती पनवेल यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व प्रार्थना ने करण्यात आली कार्यक्रमात बचत गटातील महिलांनी विविध स्टॉल लावले होते तसेच VRF निधीतून गरजू निराधार आदिवासी महिलांना धान्य वाटप करण्यात आले तसेच उत्कृष्ट बचत गटांचे श्रेणीकरण करून त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले
ग्राम संघाचे अध्यक्ष यांनी दशसूत्री प्रमाणे आपला ग्रामसंघ कसा कार्य करतो व सरकारकडून आलेले निधी याबद्दल सविस्तर माहिती दिली .
गटविकास अधिकारी साहेबांनी महिलांना योग्य मार्गदर्शन दिले व भरभरून गावाचे ग्रामपंचायतीचे सरपंचांचे व ग्राम संघाचे कौतुक केले व त्यांच्या हस्ते 2024 25 दिव्यांग निधीचे धनादेश वाटप करण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजना टप्पा (2)या योजनेअंतर्गत कुंडेवाल अंतर्गत सहा घरकुले मंजूर असून घरकुल पायाचे बांधकाम उद्घाटन तेजस्विनी महिला ग्राम संघ अध्यक्ष सचिव लिपिका सीआरपी माजी सरपंच ग्रामपंचायत अधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले .
कार्यक्रमासाठी तेजस्विनी ग्रामसंघ महिला बचत गट कार्यकारणी समिती कुंडेवहाल गावचे मा. सरपंच सदाशिव वास्कर साहेब मा. उपसरपंच सौ .संगीता रमण वास्कर मा. श्री संतोष नामदेव ठोंबरे प्रशासक श्री संजय पांडुरंग बडे ग्रामपंचायत अधिकारी मा. श्री मिलिंद बाचल प्रभाग समन्वय या मान्यवरांनी उपस्थिती दाखवली पूर्ण जिल्ह्या मध्ये प्रथमच तेजस्विनी महिला ग्राम संघ कुंडेवहाल येथे ग्राम संघाला स्वतःचा ऑफिस झाल्याचे ग्राम संघाच्या अध्यक्षा सौ. प्रीती वास्कर यांनी सांगितले आणि यांचे सर्व श्रेय आमदार बालदी साहेब ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच साहेब यांना देत आहेत आणि तेजस्विनी ग्राम संघाला महिला दिनाच्या दिवशी हे एक अनमोल भेट आम्हाला मिळाली असे महिलांनी सांगितले आहे.
Comments
Post a Comment