आवाज कोकणचा / पेण 

वार्ताहर - अरुण चवरकर 

गुरुने दिला ज्ञानरूपी वसा या पंक्तीतील भेटीसाठी आतुर विध्यार्थी शिक्षकांची चाळीस वर्षानंतर दुर्लभ भेट..

 लातूर, सातारा सांगली येथे वास्तव्यास असलेल्या गुरूंनी पेण तालुक्यातील स्वामी विवेकानंद संस्थेचे जनता हायस्कूल गडब या शाळेत 1985/88 या कार्यकाळात ज्ञानदानाचे कार्य केले होते. श्री.  मालुसरे, श्री. कोंडावले, श्री. गोखले , श्री. देसाई हे शिक्षक ज्ञान देण्याचे काम करत होते आणि पोटच्या मुलाप्रमाणे विद्यार्थ्यांना मारून झोडून घडवत होते . आज या शिक्षकांनी वयाची सत्तर वर्षे पूर्ण केली असून विद्यार्थी सुध्दा ५० / ५५ वयाच्या उंबरठ्यावर आहेत .

त्या काळात त्यांनी ज्ञान दान देण्याच काम केले पनविद्यार्थी लहानपणी आपण आपले ज्ञान देऊन आलोय ते काय करत असतील कोणत्या क्षेत्रात असतील एक मनात हुरहूर, त्यांना झोप लागत नव्हती एक लग्नाचं निमित्त मिळताच कोंडावले सर, गोखले सर, देसाई सर, लगेच पेण मध्ये मुक्कामी आले मग राहिले ते मालुसरे सर त्याना पण झोप येईना आपले विद्यार्थी पाहायचे आहेत शेवटी आज ते लातूर हुन पेण व गडब  ला आले चाळीस वर्षा नंतर ची भेट समोरासमोर पण विद्यार्थी ओळखत नाही शिक्षकांना आणि शिक्षक ओळखत नाही विद्यार्थ्यांना दोघे भावुक होऊन गेलेल्या दिवसांच्या आठवणी सांगण्यात रमले त्यावेळची परिस्थितीने गांजलेले अनेक चटके सोसलेले पोटाला पोटभर अन्न नव्हते आणि शाळेचा मळलेला युनिफॉर्म यातून मार्ग काढत आज हे विद्यार्थी अनेक क्षेत्रात शिक्षक, डाॅक्टर, विस्तार अधिकारी, सैनिक, पोलिस विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेले विद्यार्थी पाहून शिक्षक भारावून गेले .


आपण दिलेल ज्ञान वाया गेलं नाही एक आदर्श विद्यार्थी घडवले यांचा समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता आज आपण बघत आहोत माजी विद्यार्थी एकत्र येतात जून्या आठवणींना उजाळा देत मजा मस्ती करून जातात पण आपण असे शिक्षक पाहिलात का वय वर्षे 70 होऊन विद्यार्थी कसे असतील चांगले  घडलेत की नाही याचा शोध  घेत हजारो कीलो मीटर दुर लातूर, सोलापूर , तासगाव हून पेण गडब पर्यंत येणारे शिक्षक शोधून सापडणार नाहीत.



 आणि या भेटीनंतर विद्यार्थी उद्गारले सर आंम्हाला असे शिक्षक भेटले म्हनून आंम्ही घडलो धन्य ते शिक्षक आणि विद्यार्थी याला म्हणतात गुरू शिष्य प्रेम या वेळी उपस्थित विद्यार्थी जे के पाटील,डी एन म्हात्रे, विनायक पाटील, काशिनाथ म्हात्रे, मोरेश्वर मोकल, गुणाजी मोकल, दिपक पाटील, संजय चवरकर हे सर्व अरूण चवरकर यांच्या निवासस्थानी भेट घेऊन गडब येथे विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी गेले आहेत



Comments

Popular posts from this blog