आवाज कोकणचा / नवी मुंबई 

रमझानच्या पवित्र महिन्यात अमरीन मुखरी व त्यांच्या परिवाराकडुन गरीब गरजूंना धान्याचे वाटप



   उरण / पूजा चव्हाण

                सध्या रमझानचा पवित्र महिना सुरु असून मुस्लीम समाज्यात रोजा धरणे हे मुस्लीम बांधवांचे कर्तव्य आहे.  मुस्लीम  कालगणनेच्या महिन्यांतील 9 वा महिना रमझान असून तो महिना अत्यंत पवित्र महिना आहे.  या महिन्यात रोजे धरले जातात रमझान महिन्यात मुस्लीम बांधव मोठया प्रमाणात दानधर्म करतात भाईचारा पाळतात आणि शव्बात या  10 व्या महिन्याचा पहिला दिवस म्हणजेच रमजान इदीचा दिवस साजरा केला जातो.


यामहिन्यात दानधर्म करण्याची मोठी प्रथा आहे. अमरीन मुक्री या उरण तालुक्यांतील मुस्लीम समाज्यामधील  सामाजिक कार्यकर्त्या असून गेली 33 वर्षे त्या सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.त्यां नचुकता दरवर्षी या महिन्यात गरीब गरजूंना मदत करीत असतात आत्तापर्यंत त्यांनी अनेक गरजूंना मदत केली आहे.



         या संदर्भात अमरीन मुक्रीना आमच्या प्रतीनिधिनी विचारले असता त्या  म्हणतात मी उरणमध्ये राहात असून या महिन्यात दरवर्षी आमच्या परिवाराच्या आणि देणगीदारांच्या मदतीने मी गरजूंना मोठयाप्रमाणात दानधर्म करीत असते यंदाही 500 पेक्षा अधिक गरजूंना मी  अनधान्य व इतर गोष्टींची मदत केली आहे.



   त्यामुळे मला व माझ्या परिवाराला मानसिक समाधान आणि आनंद मिळतो आणि गरीब गरजूंना त्याचा लाभ मिळतो आणि त्यांची ही गरज भागली जाते. रोजे धरले जातात त्यावेळी काही लोक विश्रांती घेणे पसंद करतात त्यावेळी मी   गरजूंच्या सेवेत व त्यांना मदत करण्यात माझा वेळ घालवीत असते.


 माझ्या या सेवेत माझा सारा परिवार माझे पती,मुले,नातवंडे  मला सहकार्य करतात त्यामुळे त्यांच्या मनावरही सेवा करण्याचा संस्कार निर्माण होत असतो रमझानच्या पवित्र महिन्यात आमच्या परिवाराकडून सेवा कार्य घडत असल्याने माझ्या परिवारालाही आनंद मिळत असतो असे त्या शेवटी म्हणाल्या



Comments

Popular posts from this blog