आवाज कोकणचा / नवी मुंबई 

उरण ( पुजा चव्हाण )

अपघात टाळण्यासाठी वाहने सुरक्षित चालविण्याचे उरण वाहतुक शाखा पोलीस निरीक्षक श्री. अतुल दहिफळे यांचे आवाहन



     मागील काही महिन्यात उरण  तालुक्यात मोटार सायकल अपघातांचे प्रमाण वाढले असून त्यामध्ये अनेक लोक मृत्युमुखी  पडले आहेत. २०२४ ते या वर्षी  आत्ता पर्यंत १९०  मोटर सायकल व जड - अवजड वाहन चालवणाऱ्या चालकांवर मद्य प्राशन करून गाडी चालवल्या मुळे कारवाई करण्यात आलेल्या आहेत. 



त्यामुळे अपघातातचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत आहे 

     सध्या उरण तालुक्यात गावोगावी  ग्रामदेवतेची यात्रा व पालखी सोहळे उत्साहात साजरे होत असून  या वेळी अनेक ठिकाणी मद्य प्राशन करून वाहन चालविण्याचे प्रमाण वाढत आहे. 


यामुळें  अपघातांच्या संख्येत प्रकर्षाने वाढ होण्याची शक्यता असते. 

त्यामूळे  कोणीही कोणत्याही प्रकारची नशा ( दारू ) करून वाहन ( विशेष करून मोटार सायकल ) चालवून अपघातास कारणीभूत होऊ नका ही आपल्या सर्व उरण वासियांना कळकळीची विनंती आहे असे आवाहन उरण वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अतुल दहिफळे यांनी उरण विभागातील जनतेला केले आहे. 

Comments

Popular posts from this blog