आवाज कोकणचा / नवी मुंबई
पनवेल - प्रतिनिधी
पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्रच्या उरण तालुका अध्यक्षपदी डॅशिंग पत्रकार पूजा चव्हाण यांची नियुक्ती...
पत्रकार उत्कर्ष समिती उरण तालुका अध्यक्षपदी शिवराज्य न्युज चैनलच्या डॅशिंग पत्रकार पूजा चव्हाण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
रविवार दिनांक 13 एप्रिल रोजी शासकीय विश्रामगृह पनवेल येथे झालेल्या निवड प्रक्रिये वेळी पत्रकार उत्कर्ष समिती चे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ.श्री अशोक म्हात्रे यांनी सर्वांच्या उपस्थितीत पूजा चव्हाण यांची उरण तालुका अध्यक्षपदी निवड घोषित केली.
समाजात घडणाऱ्या विविध विषयांवर आक्रमकपणे लिखाण करून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या लेखणच्या माध्यमातून पूजा चव्हाण पत्रकारिता करत असतात.
पूजा चव्हाण यांच्या या निवडीने समाजातील विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
Comments
Post a Comment