आवाज कोकणचा / नवी मुंबई
नेरुळ (नवी मुंबई) – प्रतिक यादव
नेरुळ येथे निवासी वसाहतीत उच्च दाबाच्या ब्लास्टिंगचा धोकादायक प्रकार नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण,....
अकार्यक्षम नेरूळ वार्ड अधिकारी जावडेकर यांची निष्क्रियता स्थानिक नागरिकांच्या तक्रारीला केराची टोपली...
वय
नेरुळ सेक्टर १६ A येथील इमारत विकास प्रकल्पात प्लॉट मालक डॉ. मनीषा जाधव, डायमेन्शन आर्किटेक्ट आणि संबंधित कंत्राटदार यांनी उच्च दाबाचे ब्लास्टिंग करून परिसरातील नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
या धोकादायक ब्लास्टिंगमुळे रोज होणाऱ्या कंपनांनी आणि मोठ्या आवाजाने परिसरातील रहिवासी त्रस्त झाले आहेत. विशेषतः लहान बालके, वृद्ध नागरिक व आजारी व्यक्तींना या स्फोटांमुळे मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या निवासस्थानांमध्ये तडे जाण्याचे प्रकार समोर आले असून, यामुळे भविष्यात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रशासनाचे दुर्लक्ष – वारंवार तक्रारी असूनही कोणतीही कारवाई नाही
नागरिकांनी यासंदर्भात नेरुळ वॉर्ड अधिकारी श्री. जावडेकर यांच्याकडे अनेक वेळा तक्रार करूनही, त्यांनी याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. अधिकारी जावडेकर यांच्यावर कर्तव्यातील निष्काळजीपणा आणि अकार्यक्षमता याबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी वाढत आहे.
नागरिकांमध्ये तणाव, समाजसेवकांनी घेतली तत्काळ दखल
सदर प्रकरणात स्थानिक समाजसेवक स्वप्निल घोलप आणि पत्रकार प्रतीक यादव यांनी त्वरित घटनास्थळी भेट दिली. त्यांनी त्रस्त नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. घटनास्थळी भीती, घबराहट आणि तणावाचे वातावरण स्पष्टपणे जाणवत होते.
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी घोलप व यादव यांनी नवी मुंबई महापालिका प्रशासनाशी पत्रव्यवहार सुरू केल्याचे कळते. त्यांनी नागरिकांना आश्वासन दिले आहे की, या गंभीर प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत पाठपुरावा सुरू राहील.
नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे काय निर्णय घेणार?
सदर प्रकार नवी मुंबई महानगरपालिकेच्या नियमावलीस आणि नागरिकांच्या सुरक्षेला आव्हान देणारा आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे यांच्याकडून या गंभीर प्रकरणात काय कारवाई केली जाईल, नेरूळ वार्ड अधिकारी जावडेकर यांना निलंबित करण्याच्या स्थानिकांच्या मागणीवर आयुक्त काय निर्णय देतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नेरुळ मधील रहिवाशांनी प्रशासनाकडे स्पष्ट मागणी केली आहे की, या ब्लास्टिंग कार्यास त्वरित स्थगिती देऊन थांबवण्यात यावे. दोषी व्यक्तींवर कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यात यावी
आणि भविष्यात अशा प्रकारांवर स्थायी बंदी घालण्यात यावी. या घटनेने विकासाच्या नावाखाली नागरिकांच्या सुरक्षिततेशी होत असलेली खेळपट्टी पुन्हा एकदा उजेडात आली आहे.
खोटी बातमी
ReplyDelete