आवाज कोकणचा / नवी मुंबई

पनवेल - प्रतिनिधी

 पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्रच्या संघटकपदी जेष्ठ पत्रकार सामाजिक कार्यकर्ते गुरूनाथ तिरपनकर  यांची नियुक्ती...



कोकण सुपुत्र जेष्ठ पत्रकार  व सामाजिक कार्यकर्ते श्री गुरुनाथ तिरुपणकर यांच्या धडाडीच्या कार्याची दखल घेत पत्रकार उत्कर्ष समितीच्या शासकीय विश्रामगृह पनवेल येथे झालेल्या सभेमध्ये सर्वानुमते महाराष्ट्र प्रदेश संघटक पदी निवड करण्यात आली आहे.


रविवार दिनांक 13 एप्रिल रोजी शासकीय विश्रामगृह पनवेल येथे झालेल्या निवड प्रक्रिये वेळी  पत्रकार उत्कर्ष समिती चे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ.श्री अशोक म्हात्रे यांनी सर्वांच्या उपस्थितीत महाराष्ट्र संघटक पदी निवड झाल्याची घोषणा केली तसे पत्र देण्यात आले

समाजात घडणाऱ्या विविध घडामोडींवर नजर ठेवून समाजाला आवश्यक मदत करण्यासाठी श्री तीरपणकर नेहमी अग्रेसर असतात.  अनेक वेळा सामाजिक जाणीव याचे भान ठेवत स्वतः आर्थिक मदत करून गोरगरिबांना मदतीचा हात पुढे करत असतात.

श्री तिरपणकर यांच्या या निवडीमुळे समाजातील विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.





Comments

Popular posts from this blog