आवाज कोकणचा / रायगड
पेण
गावच्या रस्त्यासाठी तरुणांची एकजूट...
वार्तावर पूजा चव्हाण
वढाव ते घोडा बंदर व लाखोले ह्या रस्त्याचे काम मागील वीस, पंचवीस वर्ष कितपत पडलेले आहे तसेच वढाव ते लाखोले रस्त्याला डांबरीकरण करून चौदा ते पंधरा वर्षे झाली तरी अजून सदर रस्त्याचे डांबरीकरण काम केलेले नसल्याकारणाने या रस्त्यावर खूप मोठे, मोठे खड्डे पडलेले आहेत. तसेच या रस्त्यावरून प्रवास करणारे वयोवृद्ध व्यक्ती व शाळेय विद्यार्थी तसेच उदरनिर्वाहासाठी शहराकडे जाणारे नोकरवर्ग यांना गावाकडे येणारे - जाणारे वाहन बस सेवा नसल्या मुळे पूर्ण प्रवास पाई करावा लागत आहे त्यात कुणाची सायकल मोटर सायकली माध्यमातून प्रवास सुरू आसेल तर तोही अवघडच खड्ड्यांमुळे अनेक वेळा सायकली मोटरसायकली पंचर होऊन त्या सायकली हातामध्ये दोन किलोमीटर ढकलत घ्याव्या लागत आहे .
कारण मध्ये रस्त्याला खेडेगावातल्या कारणाने कुठेही टायर पंचर ची सुविधा नाही ती थेट वढाव मध्ये आहे त्यामुळे येथील सर्वच जनतेला त्खड्ड्यांमुळे खूप त्रास होत आहे शिवाय सदर रस्ता हा अरुंद असल्याकारणाने रस्त्यावरून दोन वाहने पास होत नाहीत खाड्यांवर बांधलेले पूल आणि पुलावरून लगेच असणारे यु टन त्यामुळे मोठी बस वाहन यांना फिरणं टन घेणं कठीण होत.
अनेक वेळा एस.टी मंडळाची अधिकारी येथून सादर रस्त्याची पाहणी करून गेले परंतु अरुंद रस्ता असल्याकारणाने त्यांनीही बस सेवा चालू करण्यासाठी नकार दिला. त्याच मुळे इथे बस सेवाही सुरू नाही. त्यामुळे येथील नागरिकांची दोन किलोमीटरची रोजची पायपीट गेली कित्येक वर्ष सुरू आहे. कोणी आजारी पेशंट पडल्यास या रस्त्यावरून नेताना त्याचे खूप हाल होतात. असं असतानाही शासनाने मंजूर केलेल्या रस्त्याच्या निधी मुदत संपून परत जातात तरीही येथील रस्ता, वासरू आजही रस्ता नूतनीकरणाचे वाटेवर आशेची नजर देऊन वाट पाहत आहे. तसेच घोडा बंदर हा रस्ता गेली बरीच वर्ष मुरूम मातीने बनवलेला असल्याकारणाने व मागील तीन वर्षांपूर्वी आलेली रस्त्याची निधी वेळेत काम झाल्याने परत जाऊन सदर काम रखडून राहिल्यामुळे पावसाळी रस्त्यावर चिखल होऊन जनतेला रस्ता असूनही चिखलातून प्रवास करावा लागतो मग येणारे गणपती सण चिखलातून मुंबई पनवेल ला जॉबला असणारे येथील स्थानिक यांना चिखलातून प्रवास करावा लागतो या रस्त्यांना निधी स्थानिक आमदार महोदय याकडून पुन्हा मंजूर झाला तरीही त्या रस्त्यांचे काम ठेकेदारांच्या इतर कामांमुळे पूर्ण होत नाही तरी गेली दहा-बारावर दिवस पंचक्रोशी या ग्रुपवर अनेक तरुण, क्रिकेट प्रेमी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून रस्ता संदर्भात चर्चा होत होत्या आणि काल या चर्चेला उधाण येऊन ही सर्व तरुण पिढी एकत्र येऊन 40 ते 50 युवा यांनी स्थानिक आमदार महोदय श्री. रवींद्र पाटील साहेबांची भेट घेऊन सदर विषय त्यांना समजावून सांगितले असता साहेबांनी सदर कामाच्या ठेकेदार यांना बोलवून कामाचे कार्यारंभ करण्यासाठी बुधवार हा दिवस नेऊन त्या दिवशी माती भरावाचे काम सुरू होण्याचे आश्वासन दिले आहे त्यामुळे येथील जनतेला आता रस्त्यावरून प्रवासाचा मोकळा श्वास नक्कीच घेता येईल व्हाट्सअप ग्रुप चा फायदा येथील तरुण युवकांनी घेत एकत्र येऊन अखेर ह्या रस्त्याचा विषय मार्गी लावण्यासाठी एकीचं बल दाखवला आहे.
आशा असेल की यावर्षी हा डांबरी रस्ता साहेबांनी दिलेले शब्द प्रमाणे पूर्ण होईल
Comments
Post a Comment