आवाज कोकणचा / नवी मुंबई

जासई दास्तान फाटा उड्डाण पुलावर पुन्हा अंकिताचा अपघातात मूत्यू.



( उरण प्रतिनिधी -  पूजा चव्हाण )

   उरण तालुक्यातील अपघातांची मालिका काही संपता संपत नाही. पुन्हा तेच तेच होत आहे .यमाचे बोलवणं चालूच आहे. 



   उरण मधील रस्ते आणि त्यावरील अपघात हे समीकरण काही  बदलतच नाही. दिनांक २९ एप्रिल हा काळा दिवस उजाडला आणि पुन्हा एकदा दास्तान फाटा उड्डाणपूलावर भीषण अपघात झाला. यामध्ये  बळी गेली अंकिता मयेकर हि 29 वर्षीय तरुणी हिचा जागीच मृत्यू झाला. ट्रेलर ने जोरदार धडक दिल्याने अंकिताच्या डोक्याला जबर मार बसला. आणि तिचा जागीच मृत्यू झाला.


     अंकिता ही नवी मुंबईत नोकरीनिमित्त  रेल्वे ने जात असे पण तीला थोडा उशीर झाल्याने तीची रेल्वे चुकली आणि काळाने नेमके हेच हेरले, तिला वेळेवर पोहोचण्यासाठी तिने मोटरसायकल काढली आणि हाच निर्णय तिचा जिवघेणा  ठरला. हा प्रवास तिचा आयुष्याचा शेवटचा प्रवास ठरला.

     जेएनपीटी,ओएनजीसी,बी पीसीएल सगळे मोठमोठे प्रकल्प उरण मध्ये आहेत पण त्याचा उपयोग  जनतेसाठी नाही च असेच म्हणावे लागेल.कारण सुस्सज्य असे हॉस्पिटल एकही उरणमध्ये अजूनही उभे राहिले नाही . मग या कंपन्यांचा सीआरएस फंड जातो कुठे? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडत आहे . दास्तान फाटा उड्डाणपूल सुरू झाल्यापासून हा चौथा बळी असेल.पण यावेळी हा बळी एका तरुणीचा गेला आहे. हा अपघात नसून प्रशासनाच्या नामुष्कीचा प्रत्यय आला आहे. 

    उरण मध्ये रस्त्यावर अपघात झाला तर उपचारासाठी कुठे नेणार ?हा पहिला प्रश्न भेडसावत आहे योग्य वेळी  योग्य उपचार कुठे होतील? अशा अनेक  प्रश्नांची उत्तरे उरणकरांना अजूनही  मीळत नाहीत. राजकारणी लोकांच्या पक्षातील तळ्यात मळ्यात मारलेल्या उड्या यांच्याकडे लक्ष न देता उरणच्या नागरिकांनी एकत्र येऊन या विषयावर वेळीच तोडगा काढला नाही तर अजून किती बळी जातील ? हे काही सांगता येणार नाही किंवा आता यानंतरचा बळी कोण? असा विचार करण्याची वेळ आली आहे.



Comments

Popular posts from this blog