आवाज कोकणचा / नवी मुंबई
पनवेल - प्रतिनिधी
सत्याची वाटचालचे संपादक श्री गोविंद जोशी यांची पत्रकार उत्कर्ष समितीच्या कोकण अध्यक्षपदी निवड , विविध स्तरातून होतोय अभिनंदनाचा वर्षाव ...
रायगडचे सुपुत्र सत्याची वाटचाल वृत्तपत्राचे संपादक व धडाडीचे पत्रकार श्री . गोविंद जोशी यांच्या पत्रकारीता क्षेत्रातील व सामाजिक कार्याची दखल पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांनी घेऊन शासकिय विश्रामगृह पनवेल येथे झालेल्या सभेमध्ये सर्वानुमते कोकण अध्यक्ष पदी निवड केली आहे.
रविवार दिनांक 13 एप्रिल रोजी शासकीय विश्रामगृह पनवेल येथे झालेल्या निवड प्रक्रिये वेळी पत्रकार उत्कर्ष समिती चे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ.श्री अशोक म्हात्रे यांनी सर्वांच्या उपस्थितीत महाराष्ट्र संघटक पदी निवड झाल्याची घोषणा केली तसे पत्र देण्यात आले
समाजात घडणाऱ्या विविध घडामोडींवर नजर ठेवून समाजाला आवश्यक मदत करण्यासाठी श्री. गोविंद जोशी नेहमी अग्रेसर असतात. अनेक वेळा सामाजिक जाणीव याचे भान ठेवत स्वतः आर्थिक मदत करून गोरगरिबांना मदतीचा हात पुढे करत असतात.
श्री. जोशी यांच्या या निवडीमुळे समाजातील विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. यावेळी समिती सचिव डॉ. वैभव पाटील यांच्यासह अनेक सदस्य व पदाधिकारी उपस्थीत होतें.
Nice 👍👌👏👏
ReplyDelete