मराठी भाषिक एकीकरण संघटना उलवे चा महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्न ...

 आवाज कोकणचा / नवी मुंबई

उलवे - प्रतिनिधि 


मराठी भाषिक एकीकरण संघटना उलवे चा महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्न ...

नवी मुंबई मधील उलवे विभागातील मराठी भाषिकांना एकत्र आणण्यासाठी पत्रकार उत्कर्ष समितीचे पनवेल तालुका सदस्य श्री नरेंद्र देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी कंबर कसली असून उलवे मध्ये वाढत चाललेल्या परप्रांतीय व इतर भाषिकांमुळे येथील स्थानिक जनता व उलवे मधील मराठी रहिवाशी यांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.


परप्रांतीयांनी उलवे मध्ये मोठ्या प्रमाणावर  दुकाने , आठवडे बाजार यासह भंगारची दुकाने या सारख्या व्यवसायात बस्तान बसवले असून येथील स्थानिक आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून उलवेमध्ये स्थायिक झालेल्या मराठी माणसावर अन्याय होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.



हाच धागा पकडून येथील युवक 

नरेंद्र देशमुख, अजय हेगडकर, दिनेश पवार,स्वप्नील घाडगे, वैभव शेंडगे,मनोज चंद्रमोरे,अजित शेंडगे, विकास खंडागळे, संदीप लवटे,मनोज कोळी, सुनील कोळी, वैभव निर्भवणे, बाबाजी कोकाटे, हितेश शिंगरे आदींनी  एकत्र येऊन मराठी भाषिक एकीकरण संघटना स्थापन केली व उलवे विभागातील मराठी भाषिकांना एकत्र आणण्याचे कार्य सुरू केले आहे.



एक मे महाराष्ट्र दिन या दनाचे औचित्य साधत मराठी भाषिक एकीकरण संघटना उलवे यांनी सेक्टर 19 मधील चौकाचे छत्रपती शिवाजी महाराज चौक असे नामकरण करून ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न केला. 

मराठी भाषिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी व आपल्या अधिकाऱ्यांची जाणीव व्हावी याकरिता याच दिवशी संध्याकाळी बाईक रॅली उलवे विभागात काढण्यात आली होती यामध्ये शेकडो युवक सामील होऊन मराठी भाषिकांना एकत्र येण्यासाठी आवाहन करत होते.




Comments

Popular posts from this blog