आवाज कोकणचा / नवी मुंबई 

कॉ . संतोष पवार व कॉ. रामदास पगारे यांचे आझाद मैदान मुंबई येथे कामगारांच्या प्रलंबित मागण्यासाठी अमरण उपोषण..


वार्ताहर पुजा चव्हाण 

राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायत कामगार कर्मचारी यांच्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित मागण्यांवर राज्याचे तत्कालीन  मुख्यमंत्री मा.ना.एकनाथ जी शिंदे यांनी तत्कालीन राज्याचे मुख्य सचिव मनूकूमार श्रीवास्तव , वीत्त सचिव मनोज गुप्ता, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव श्री सुमंत भांगे, नगरविकास विभाग प्रधान सचिव सोनिया सेठी, आयुक्त तथा संचालक डॉ किरण कुलकर्णी असे उच्च पदस्थ आधिकार्यांच्या उपस्थित दिनांक २०/३/२०२३ रोजी विधान भवन येथे सकारात्मक निर्णय घेण्यात आले. परंतू गेले २ वर्षे होऊनही या सकारात्मक निर्णयाची अमलबजावणी न झाल्याने विविध कामगार संघटनांनी सातत्याने या बाबत सतत पाठपुरावा आमलबजावणी करिता धरणे, मोर्चे , लॉग मार्च असे विविध प्रकारे आंदोलने करण्यात आली त्या - त्या वेळी इतिवृत्त तयार करण्यात आले परंतू अपेक्षित आमलबजावणी झालीच नाही. 

यामुळे या प्रदिर्घ काळापासून प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि प्रलंबित प्रश्न सोडवून घेण्यासाठी तसेच नगरविकास विभाग आणि वीत्त विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मनातील नकारात्मक भूमिकेमुळे कामगार कर्मचारी, निवृत्त कर्मचाऱी वर्गाचे मोठ्या प्रमाणात होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी त्याच प्रमाणे राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायती मधील हजारो कामगारांची अस्मिता जपण्यासाठी राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य नगरपरिषद नगरपंचायत कामगार कर्मचारी संघर्ष समितीचे मुख्य संघटक कामगार नेते ॲड कॉ संतोष पवार उरण नगर परिषद व उत्तर महाराष्ट्र नगर परिषद कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉ.रामदास पगारे.मनमाड नगर परिषद  यांच्यावरील व ईतर कामगार प्रतिनिधीवर रोषापोटी, आकस व सुडबुद्धीने हेतुपुरस्सर केलेली कारवाई त्वरित मागे घेण्यात यावी म्हणून सोमवार दिनांक २६ /५/२०२५ रोजी महाराष्ट्र राज्य संघर्ष समितीचे नेते काॅ. डॉ डि एल कराड, ॲड सुरेश ठाकूर, रामगोपाल मिश्रा, रामेश्वर वाघमारे, ॲड सुनील वाळूंजकर, अनिल जाधव, अनिल पवार, आण्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान मुंबई येथे कॉ.संतोष पवार  उरण व कॉ.रामदास पगारे.मनमाड हे अमरण उपोषणास बसणार आहेत.

Comments

Popular posts from this blog