आवाज कोकणचा / नवी मुंबई 

आरपीआय उरण तर्फे  “भारत जिंदाबाद यात्रा” संपन्न

वार्ताहर - पुजा चव्हाण



भारतीय सैनिकांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी आरपीआय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री आद.ना.रामदासजी आठवले साहेब यांनी संपुर्ण भारतभर “भारत जिंदाबाद यात्रा” काढण्याचे आदेश जाहिर केले होते. त्या अनुषंगाने दिनांक - २५ मे २०२५ रोजी सकाळी १२ वाजता उरण तालुका अध्यक्ष संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली उरणमध्ये “भारत जिंदाबाद यात्रा” काढण्यात आले. सदर “भारत जिंदाबाद यात्रा” हि उरण आरपीआय कार्यालय येथून निघून डॉ. बाबासाहेब आंबेडकर बालोद्यान उरण बौद्धवाडा येथे परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळ्यास अभिवादन करून यात्रा संपन्न झाली. 



यावेळी आरपीआय उरण तालुका अध्यक्ष संजय गायकवाड, शिवसेनेचे सुलेमान शेख, आरपीआय उरण उपाध्यक्ष खालीक शेख, तालुका युवक अध्यक्ष सुयोग गायकवाड, सचिव सुनील कोल्हे, शहर अध्यक्ष सूर्यकांत शिंदे, सहसचिव देवेंद्र कोळी, चारफाटा - शैलेश मूलके, बौद्धवाडा - कुणाल जाधव,



 विशाल कवडे, प्रज्वल वाघमारे, मांगीरा- लाल नूर शेख, नरेश बॅगर, प्रकाश पिल्ले, प्रकाश गुलद, संजय गायकवाड, दत्ता गायकवाड, अतुल पुंदीर, प्रशांत भागा, भवरा - रमेश कातकरी, प्रकाश धसाडे, गौतम कांबळे, सिद्धार्थनगर - जयभीम झळकी, धुळप्पा, डाऊरनगर - आज्ञाराम यादव आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्तित होते.

Comments

Popular posts from this blog