मी अजूनही शेकाप मध्येच. महाविकास आघाडीतून बाहेर पडलोय.... जे एम म्हात्रे
आवाज कोकणचा / नवी मुंबई
मी अजूनही शेकाप मध्येच. महाविकास आघाडीतून बाहेर पडलोय.... जे एम म्हात्रे
पनवेल.. .मिलिंद खारपाटील
महाविकास आघाडीचा धर्म घटक पक्षांनी आघाडी धर्म पाळला नाही त्यामुळे उरण सह रायगड मधील शेकाप च्या चार सीट पडल्या.
आम्ही पक्षाच्या उमेदवाराविरोधी लढलो नाही. त्यामुळे गद्दार नाही. ७४ वर्षांच्या आयुष्यात आतापर्यंत शेकाप बरोबर एकनिष्ठ राहिलो. ४७ वर्ष शेकाप कार्यकर्ता म्हणून काम केले.
शेतकरी आंदोलनात सहभाग घेतल्याने पोलिसांचा मार खावा लागला.अनेक विकास कामे केली.जनतेची लढाई प्रामाणिक राहून लढलो.मात्र आता काही जण आम्हाला विचारात न घेता शेकाप च्या मीटिंग ला सुद्धा बोलावत नाही . मी उद्या माझ्या कार्यकर्त्यांची मीटिंग घेऊन सर्वानुमते जो निर्णय होईल तो निर्णय मी जाहीर करीन.असे उद्गार शेकाप नेते पनवेल चे माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे यांनी जाहीर केले.
पनवेल मधील मार्केट यार्ड मधील त्यांच्या कार्यालयात त्यांनी ही घोषणा केली.
यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली.
Comments
Post a Comment