आवाज कोकणचा / नवी मुंबई
"ऑपरेशन अभ्यास"
उद्या उरणमध्ये मॉक टेस्ट
नागरिकांनी घाबरू नये, प्रशासनास सहकार्य करावे...
उरण वार्ताहर / पुजा चव्हाण
या मॉक ड्रिलच्या दरम्यान शासनाकडून सूचना मिळाल्यानंतर दुपारी ४ वाजता नागरी संरक्षण दलाचे सायरन वाजवून नागरिकांना धोक्याचा इशारा दिला जाईल.उरण येथे आग लागल्याच्या बनावावर आधारित मॉक ड्रिल होणार असून, नागरी संरक्षण दल, वैद्यकीय पथक व इतर आपत्कालीन सेवांकडून बचावकार्य, शोध मोहिमा व नागरिकांसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
सायंकाळी उरण शहरातील काही भागांमध्ये ५ मिनिटांसाठी ब्लॅकआउट (प्रकाशव्यवस्था बंद) करण्यात येणार आहे. नागरिकांनी घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, आणि दिलेल्या सूचनांचे पालन करावे. मॉक ड्रिल ही केवळ पूर्वतयारीचा भाग असून कोणतीही खरी आपत्ती उद्भवलेली नाही, हे लक्षात घ्यावे.
जिल्ह्यात इतर कोणत्याही ठिकाणी मॉक ड्रिल आयोजित करण्यात आलेली नाही, याची नागरिकांनी नोंद घ्यावी.
युध्दजन्य परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी खालील काळजी घ्यावी.
१. प्रशासनामार्फत हवाई हल्याच्या वेळी कमी जास्त आवाजात वाजवळे जाणारे सायरानचा आवाज आल्यानंतर त्वरीत सुरक्षित ठिकाणी आंश्रय घेण्यात यावा. सायरान दोन मिनिटे कमी जास्त आवाजात ऐकु आल्यानंतर उंच इंमारतीमध्ये राहणाऱ्या नागरीकांनी आपल्या घरातील इलेक्ट्रीसिटी ग्रॅस लाईन बंद करुन इमारीतीच्या खाली येवून सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.
२. सायरन ऐकाच आवाजामध्ये दोन मिनिटे वाजल्यानंतर धोका संपल्याची सुचना मिलत असते त्यावेळी सर्व नागरीकांनी ज्या ज्या ठिकाणी आश्रय घेतलेला आहे. त्याठिकाणावरुन सुरक्षित बाहेर पडून आपल्या सर्व परिसराची पाहणी करुन तसा अहवाल प्रशासनाच्या नियंत्रण केद्रास देण्यात यावा. की जेणेकरुन आपल्याला त्वरीत मदत उपलब्ध करता येईल.
३. सुरक्षित ठिकाणी आश्रय घेत असताना आपल्या सोबत पिण्याच्या पाण्याचा साठा, ड्रायफुडस तसेच मेडीसिन घेवून सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.
४. युध्दजन्य परिस्थितीमध्ये कोणत्याही अफवानवर विश्वास ठेवू नका, आपल्या सोबत रेडीओ, मोबाईल चा वापर करा की जेणेकरुन प्रशासनानी वारंवार दिलेल्या सुचनांच आपल्याला पालन करता येईल.
५. प्रकाशबंदी नियमा संदर्भात प्रशासनाने दिलेल्या सुचनाच तंतोतत पालन करुन आपल्या आजू बाजूची माहिती असने आवश्यक आहे.
६. युध्दजन्य परिस्थितीमध्ये कोणीही आफवा पसरवण्याचा प्रयत्न केल्यास नियमा नुसार कडक कार्यवाही करण्यात येईल.
७. युध्दजन्य परिस्थितीमध्ये नागरिकांनी घाबरुन न जाता लोकांचे मनोधेय उंचावणे महत्वाचे आहे. प्रशासनानी दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.
Comments
Post a Comment