आवाज कोकणचा / नवी मुंबई 

 आ.महेश बालदी यांनी केला पाऊसग्रस्त कळंबुसरे गावाचा पाहणी दौरा ..



वार्ताहर - पुजा चव्हाण

काल दिनांक २५/५/२०२५ रोजी 

उरण तालुक्यातील कळंबुसरे गावात पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच तेथील जनजीवन ही विस्कळीत झाले आहे. या नुकसानाची पाहणी करण्यासाठी आज स्वतः आमदार महेश बालदी यांनी  या ठिकाणी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.



यावेळी काही गरजूंना तातडीने आर्थिक मदत देखील करण्यात आली . 

तसेच या आपत्ती मधून पुन्हा उभं राहण्यासाठी प्रशासन सज्ज असून उरणचे तहसीलदार श्री.उद्धव कदम आणि महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांना नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत करण्याचे निर्देश दिले आहेत .

मी प्रशासनाच्या संपर्कात असून उरणवासीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आपत्तीच्या या काळात कोणीही एकटं नाही असे मत यावेळी आमदार महेश बालदी यांनी व्यक्त केले. त्यावेळी तहसीलदार श्री. उद्धव कदम व कार्यकारी अभियंता श्री.जयदीप नानोटे,  पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



Comments

Popular posts from this blog