आवाज कोकणचा / नवी मुंबई 

प्रतिनिधी 

महिला उत्कर्ष समितीच्या आवाहनाला उस्फूर्त प्रतिसाद वटपौर्णिमेनिमित्त झाडे लावून घेतला नवीन संकल्प...



पत्रकार उत्कर्ष समिती या राज्यस्तराय पत्रकार संघटनेच्या अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या सदस्य व पदाधिकाऱ्यांनी राज्यभरात विविध ठिकाणी वटपौर्णिमा सणा निमित्ताने उपलब्ध जागेत एक झाड लावण्याचा संकल्प घेतला असून



 अनेकांनी या दिवशी झाडे लावली व पुढेही अशाच पद्धतीने वृक्षारोपण करणार असल्याचे मनोगत अनेक महिला सदस्य व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे .



महिला उत्कर्ष समिती प्रदेश कार्याध्यक्ष श्रुती उरणकर , उपाध्यक्ष सौ आरती पाटील,



  नवी मुंबई तुर्भे विभाग अध्यक्ष सौ वंदना अंबवले व उपाध्यक्ष सौ. रेखा पंडित , 


ठाणे पदाधिकारी सौ मानसी मोने, 



बुलढाणा पदाधिकारी डॉ. नंदिनी रींधे यांच्यासह राज्यभरात विविध ठिकाणी अशा पद्धतीचे कार्यक्रम राबविले गेले असून भविष्यात सुद्धा वृक्षारोपण करणार असून जलवायु परिवर्तन व निसर्गाचा समतोल राखण्यासाठी खारीचा वाटा उचलणार असल्याचे म्हटले आहे. 



Comments

Popular posts from this blog