पत्रकार उत्कर्ष समितीचे उरण सदस्य श्री विशाल डाके यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत रायगड जिल्हा परिषद मराठी शाळा नवघर येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून साजरा करण्यात आला .
या कार्यक्रमासाठी पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे , डॉ. जयश्री चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर शिवसेना शाखाप्रमुख श्री. अविनाश म्हात्रे , श्री. ज्ञानेश्वर तांडेल, उपसरपंच श्री. विश्वास तांडेल , ज्येष्ठ नागरिक श्री. मोतीराम डाके, शुभम पाटील ,
सौरभ घरत, मयूर डाके, शिव मयूर डाके, अंश विशाल डाके
यांची उपस्थीती होती.
कार्यक्रमासाठी रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवघरचा शिक्षकवृंद मूख्याध्यापिका सौ. उषा राजेंद्र गावड , श्री. गणेश पांडुरंग गावंड, श्री. प्रकाश परशुराम जोशी, श्री. प्रसाद तुलशीराम म्हत्रे, श्री. अनिल वसंत म्हात्रे , सौ. सरीता गौतम गोरे यांनी विशेष मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.
यावेळी शाळेतील साधारण 150 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
Comments
Post a Comment