आवाज कोकणचा / नवी मुंबई
द्रोणागिरी मध्ये शाब्दिक बाचाबाची नंतर फिल्मी स्टाईल मध्ये हाणामारी....
उरण - पूजा चव्हाण
द्रोणागिरी हि सिडकोची वसाहत असून उरण तालुक्यातील विकसित असा परिसर आहे. त्या मुळे दिवसेंदिवस येथील मानवी वस्तीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.वसाहती, मोठमोठे टॉवर, बॅंका, ऑफीस, आठवडा बाजार, दवाखाने, अनेक प्रकारचे छोटे मोठे मॉल्स यांच्या वाढत्या संख्येमुळे आज द्रोणागिरी नोड एक महत्त्वाचे ठिकाण झाले आहे. मुंबई चे नवे उपनगर म्हणून द्रोणागिरी नोड उदयास येत आहे.
मुंबई शहराची वाढती लोकसंख्या वाढती महागाई यामुळे मुंबई शहरात राहणे सर्वसामान्य माणसाला परवडत नाही.त्यात मुंबई शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेला उरण तालुका हा अटल सेतू उरण नेरूळ लोकल रेल्वेमुळे काही अंतरावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे नागरिकांनी उरण द्रोणागिरी नोड ला सर्वाधिक पसंती दिली आहे.
वाढत्या लोकसंख्येमुळे द्रोणागिरी नोड मध्ये पाणी, अनधिकृत टपऱ्या,डम्पिंग ग्राऊंड, अजून ही सिग्नल व्यवस्था नाही. आतापर्यंत द्रोणागिरी मध्ये अनेक वाहनांचे अपघात होऊन नागरिकांच्या जीवावर ही बेतले आहे.
अशा या गजबजलेल्या वसाहतीत दिनांक १९ जून रोजी रात्री आठच्या सुमारास दोन व्यक्ती मध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन त्याचे रूपांतर मोठ्या हाणामारी मध्ये झाले. त्या वेळी ऐका अज्ञात इसमाने चाकू सारखे हत्यार मारण्यास काढले होते. गाडीच्या काचा फोडल्या यावेळी मोठ्या संख्येने इथे जनसमुदाय जमा झाला होता. मात्र पोलिसांनी घटनास्थळी येऊन दोषींना ताब्यात घेतले.व मोठा प्रसंग होण्यापासून वाचला.या अज्ञात इसमाची ओळख अजून पटलेली नसून
या वादाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
Comments
Post a Comment