पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र यांच्या वतीने पनवेल एस टी आगारातून अनियमित सुटणाऱ्या एस टी बस वेळेवर सुटण्यासाठी निवेदन.....
आवाज कोकणचा / नवी मुंबई
पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र यांच्या वतीने पनवेल एस टी आगारातून अनियमित सुटणाऱ्या एस टी बस वेळेवर सुटण्यासाठी निवेदन.....
प्रवाशांचे हाल थांबणार अधिकाऱ्यानी दिला सकारात्मक प्रतिसाद...
प्रतिनिधी - पनवेल
सध्या पावसाळी वातावरण आहे. अनेक रस्ते खराब झाले आहेत. यातच पनवेल एस टी आगारातून एस टी बस वेळेवर सुटत नाही अशी प्रवाशांची तक्रार असल्याने पत्रकार उत्कर्ष समिती च्या कार्यकारिणी मंडळाने पनवेल आगार व्यवस्थापक अश्विनी खाबडे आणि स्थानकप्रमुख ज्ञानेश्वर म्हात्रे यांची भेट देऊन निवेदन दिले. याचबरोबर पनवेल.. आवरा बस वेळेत सुटत नसल्याने अनेक प्रवासी नाराज आहेत असेही सांगितले.आणि यापुढे सर्व बस वेळेवर सोडण्याची विनंतीवजा मागणी केली. आगार व्यवस्थापक आणि स्थानकप्रमुख यांनी होकार दिला.
राज्यातील अनेक समस्यांवर ,विविध प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी, समस्या सोडविण्यासाठी पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र यांच्याकडे जनता मोठ्या आशेने पाहत आहे. आणि सकारात्मक दृष्टीने त्यांच्या अडचणी समस्या सोडविण्याचे काम केले जाते.
अहिल्याबाई होळकर योजनेतून पाचवी ते बारावी शिक्षण घेणाऱ्या मुलींना शाळेतच एस टी बस चा मोफत पास मिळणार असल्याचे आगार व्यवस्थापक अश्विनी खाबडे यांनी सांगितले.
यावेळी पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र चे अध्यक्ष डॉ अशोक म्हात्रे,सचिव डॉ वैभव पाटील,खजिनदार शैलेश ठाकूर , रायगड जिल्हा अध्यक्ष मिलिंद खारपाटील, रायगड सचिव अशोक घरत ,रायगड जिल्हा प्रतिनिधी आदित्य वाघ आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment