आवाज कोकणचा / नवी मुंबई 

पत्रकार उत्कर्ष समितीच्या उरण तालुका पदाधिकाऱ्यांनी घेतली शासकीय अधिकाऱ्यांची भेट...

जनतेच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा...

उरण -  पूजा चव्हाण

पत्रकार उत्कर्ष समिती उरण तालुका पदाधिकरी व सदस्यांनी तालुक्यातील तहसील कार्यालय, उरण पोलीस ठाणे, गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयात भेट देत समितीच्या कार्याची माहिती दिली व जनतेच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करण्यासाठी निवेदन दिले .



या निवेदनाव्दारे त्यांनी प्रशासना सोबत विविध सामाजिक व माहितीपत्र उपक्रमामध्ये भाग घेत असल्याचे सांगितले.

तसेच निवेदनात महिला सक्षमीकरण,  महिला अधिकार , जन जागृती, महिला व विद्यार्थ्यांनीसाठी कार्यशाळा आणि ग्रामीण भागात पत्रकारितेच्या माध्यमातून विकासात्मककाम करणे किती आवश्यक आहे याची माहिती देत  प्रशासन व जनता यांच्यामध्ये दुवा बनून काम करण्याचा उद्देश असल्याचे म्हटले.



प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांंदा लावून स्त्री उभी आहे. आर्थिक स्वातंत्र्य अनुभवायला शिकली आहे. तिच्या गुणांना, मतांना घरात आणि समाजातही किंमत आहे. विविध क्षेत्रे तिने पादक्रांत केली. सामाजिक संस्था, सरकार जरी या सगळ्या बदलांसाठी अग्रक्रमाने काम करत असले तरी परिस्थिती बदलायला वेळ लागेल. शहर आणि खेडे अशी तुलना केली तर अत्याचाराची, अन्यायाची रूपे फक्त बदलली आहेत. खेड्यातील स्त्री घरात अडकली असून आम्ही सामाजिक सेवा करत असल्याचे या वेळी सांगण्यात आले.



या वेळी पत्रकार उत्कर्ष समितीच्या उरण तालुका अध्यक्ष सौ. पूजा चव्हाण व उपाध्यक्ष तृप्ती भोईर, सायली साळुंके, ज्योती म्हात्रे, आदी पदाधिकारी व सदस्य  उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog